चांद्रयान -2 चं लाँचिंग प्रत्यक्ष पाहता येणार, इस्रो आजपासून सुरू करणार नोंदणी

चांद्रयान -2 चं लाँचिंग प्रत्यक्ष पाहता येणार, इस्रो आजपासून सुरू करणार नोंदणी

चांद्रयान - 2 चं लाँचिंग आपल्याला टीव्ही वर पाहायला मिळेलच पण जर तुम्हाला ते प्रत्यक्ष पाहायचं असेल तर इस्रोने खास व्यवस्था केली आहे. इस्रोच्या सतिश धवन अंतराळ संशोधन केंद्रात यासाठी एक मोठं स्टेडियम बनवण्यात आलं आहे. या स्टेडियममध्ये 10 हजार प्रेक्षक बसू शकतात.

  • Share this:

बंगळुरू, 3 जुलै : भारताचं चांद्रयान - 2 लाँचिंगसाठी तयार आहे. 9 जुलै ते 16 जुलै दरम्यानच्या काळात चांद्रयान - 2 चं लाँचिंग होऊ शकतं. आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरीकोटामधून होणाऱ्या या लाँचिंगबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

हे लाँचिंग टीव्ही वर पाहायला मिळेलच पण जर तुम्हाला ते प्रत्यक्ष पाहायचं असेल तर इस्रोने खास व्यवस्था केली आहे. इस्रोच्या सतिश धवन अंतराळ संशोधन केंद्रात यासाठी एक मोठं स्टेडियम बनवण्यात आलं आहे. या स्टेडियममध्ये 10 हजार प्रेक्षक बसू शकतात.

लाँचिंग पॅडजवळच बसण्याची जागा

यासाठीची ऑनलाइन नोंदणी 3 जुलैला रात्री 12 वाजता सुरू होणार आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाइन नोंदणी केलीत तर तुम्हाला चांद्रयानच्या लाँचिंगचा तो ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष अनुभवता येईल. यासाठी इस्रोने कोणतंही शुल्क किंवा तिकीट आकारलेलं नाही.श्रीहरीकोटामध्ये दोन लाँचिंग पॅड आहेत. सामान्य लोकांना लाइव्ह लाँचिंग पाहण्यासाठी जी जागा आहे तिथून लाँचिंग पॅड अगदी जवळच आहे.

मोठी बातमी, वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात धोनी करणार क्रिकेटला अलविदा?

इस्रोचं चांद्रयान -2 चंद्रावरच्या खनिजांबद्दल तपासणी करणार आहे. हे यान चंद्राच्या ज्या भागात पोहोचणार आहे त्या जागेवर आतापर्यंत कोणीही संशोधन केलेलं नाही.चंद्राचा हा दक्षिण ध्रुवावरचा भाग आहे.

लाँचिंगनंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. त्यानंतर ते लँडर आणि ऑर्बिटरपासून वेगळं होईल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या आसपास ठरलेल्या जागी उतरेल.

चांद्रयान- 1 यशस्वी

चांद्रयान -1 या मोहिमेनंतर 10 वर्षांनी इस्रोची ही चांद्रयान मोहीम होते आहे. 2009 मध्ये पाठवलेल्या चांद्रयानात चंद्राच्या कक्षेत फिरणारं ऑरबिटर होतं. पण चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून संशोधन करणारं रोव्हर त्यावेळी नव्हतं. यावेळी मात्र या यानाचं रोव्हर थेट चंद्रावर उतरणार आहे.

चांद्रयान - 1 या यानाने चंद्रावरचे पाण्याचे अंश शोधून काढले होते. त्याआधी 2008 मध्ये भारताने आपला उपग्रह यशस्वीपणे चंद्रावर पाठवला होता. या उपग्रहामार्फत चंद्राबद्दल महत्त्वाचं संशोधन करण्यात यश मिळालं होतं.

आता चांद्रयान - 2 मोहिमेमधलं रोव्हर जेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल तेव्हा चंद्राची आणखी रहस्यं उलगडता येतील.

====================================================================================================

मेस्सी आणि रोनाल्डोलाही 'टफ फाईट' फुटबॉल खेळणाऱ्या गायीचा VIDEO व्हायरल

First published: July 3, 2019, 2:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading