04 एप्रिल : उत्तर प्रदेशाच्या योगी आदित्यनाथ सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केलीये. यूपीतल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक लाखाची कर्जमाफी देण्यात येणार आहे.
यूपीतल्या दोन कोटी पंधरा लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हा धडाकेबाज निर्णय घेतलाय.
या कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर 36 हजार कोटींचा भार पडणार आहे. यूपीच्या निवडणुकीत भाजपनं सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन योगी आदित्यनाथांनी आता पूर्ण केलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा