हनुमान दलित आदिवासी - योगी आदित्यनाथ

हनुमान दलित आदिवासी - योगी आदित्यनाथ

रामभक्त बजरंगबली हनुमान पर्वतांमध्ये राहणारे आदिवासी होते, दलित होते, वंचित होते, असा शोध उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लावलाय आणि तोही एका प्रचार सभेत.

  • Share this:

अलवर (राजस्थान), २७ नोव्हेंबर : निवडणुकीत जातीचं कार्ड सगळेच राजकीय पक्ष वापरून घेतात. ऐतिहासिक संदर्भ देत जातीच्या नावानं राजकारण करणं नवीन नाही, पण आता तर पौराणिक पात्रांना जातीच्या चौकटीत बांधलं जातंय. रामभक्त बजरंगबली हनुमान दलित होते, असा शोध उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लावलाय आणि तोही एका प्रचार सभेत.

राजस्थानात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता ऐन रंगात आला आहे. भाजपचे स्टार प्रचारक म्हणून योगी आदित्यनाथ यांना पाचारण करण्यात आलं होतं. अलवर जिल्ह्यातल्या मालाखेडामध्ये एका प्रचारसभेत भाषण करताना योगी म्हणाले, "बजरंगबली असे देव आहेत जे डोंगरदऱ्यात राहतात. ते आदिवासी आहेत, गिरवासी आहेत, दलित आहेत, वंचित आहेत."

योगी आदित्यनाथ केवळ एवढं बोलून थांबले नाहीत, "केवळ रावणभक्तच काँग्रेसला मत देतील." योगी यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते आणि माजी खासदार प्रमोद तिवारी यांनी जयपूरमध्ये यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेतली. "इतके दिवस भाजपचे लोक केवळ माणसा-माणसांमध्ये भेद करत होते. आता तर ते देवांमध्येही भेदभाव करायला लागले. "

मतदानाला केवळ ८ दिवस बाकी असताना आता दोन्ही प्रमुख पक्ष मदारांना भुलवण्यासाठी जाती, समाज, धर्म, विकास अशा सगळ्याच मुद्द्यांवर हात धुवून घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 07:58 PM IST

ताज्या बातम्या