योगी सरकार धार्मिक ठिकाणांवरचे बेकायदेशीर लाऊड स्पीकर हटवणार!

विना परवानगी लावण्यात आलेले लाऊडस्पीकर काढण्यात येतील, असे यात म्हटले आहे. यासाठी १५ जानेवारी पर्यंत परवानगीची मुदत आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Jan 7, 2018 09:50 PM IST

योगी सरकार धार्मिक ठिकाणांवरचे बेकायदेशीर लाऊड स्पीकर हटवणार!

07 जानेवारी: योगी आदित्यनाथ सरकार आता उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील अवैध लाऊडस्पीकर हटवण्याची मोहीम हाती घेणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकार यासंबंधी पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गृहविभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्यासाठी अहवाल मागितला आहे.

विना परवानगी लावण्यात आलेले लाऊडस्पीकर काढण्यात येतील, असे यात म्हटले आहे. यासाठी १५ जानेवारी पर्यंत परवानगीची मुदत आहे. त्यानंतर १५ तारखेनंतर कोणत्याही संस्थेला परवानगी देण्यात येणार नाही. १६ जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये अभियान राबवून विना परवानगी असलेले लाऊडस्पीकर काढण्यास सुरूवात होईल. हे अभियान २० जानेवारीपर्यंत चालेल आणि पुन्हा त्याचा अहवाल बनवून राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने डिसेंबरमध्ये धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरबाबत नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाने याप्रकरणी उच्चाधिकाऱ्यांना फटकारत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2018 09:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...