Home /News /national /

भाजप मंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांच्या निधनानंतर योगींनी तातडीने बोलावली बैठक

भाजप मंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांच्या निधनानंतर योगींनी तातडीने बोलावली बैठक

माजी भारतीय क्रिकेटर चेतन चौहान यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    लखनऊ, 16 ऑगस्ट : उत्तर प्रदेशचे योगी सरकारमध्ये (Yogi Government) कॅबिनेट मंत्री चेतन चौहान (Minister Chetan Chauhan) यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी (CM Yogi Adityanath) रविवारी सायंकाळी 7 वाजता आपल्या सरकारी निवासस्थानी 5 केडीवर तातडीने बैठक बोलावली. मुख्यमंत्री योगींनी सांगितले की उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकारी आणि पूर्व क्रिकेटपटू चेतन चौहान यांचं निधन झालं आहे. ते माझ्या मंत्रिमंडळात सहकारी होते आणि उत्तर प्रदेशातील नागरिकांसाठी हा अत्यंत दु:खद क्षण आहे. मीडियामध्ये सांगताना योगी म्हणाले की ते जितके लोकप्रिय खेळाडू होते, तितकेच लोकप्रिय लोकनेताही होते. मी त्यांच्या कुटुंबीयांशी आताच संवाद साधला. सोमवारी चेतन चौहान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. माजी भारतीय क्रिकेटर चेतन चौहान यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गेल्या महिन्यांना त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना लखनऊ येथे दाखल करण्यात आले होते. ते कोरोनाशी लढा देत होते..अशातच त्यांना किडनी आणि ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला. ज्यानंतर त्यांना शुक्रवारी रात्री व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यातच आज त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री चौहान यांची 12 जुलै रोजी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना लखनऊ येथे संजय गांधी पीजीआय रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना गुरुग्राम मेंदाता रुग्णालयात हलविण्यात आले. काल आलेल्या बातमीनुसार त्यांनी किडनी काम करणं बंद झाली होती. त्यानंतर त्यांच्या शरीरातील अवयव निकामी होत गेले. कोरोनाची लागण झाल्यामुळे योगी सरकारमधील दुसऱ्या कॅबिनेट मंत्र्याचं निधन झालं आहे. यापूर्वी 2 ऑगस्ट रोजी कमला रानी वरुन याचंही निधन झालं होतं. त्यानंतर आता चेतन चौहान याच्या निधनाची बातमी समोर आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या