काँग्रेस आणि महाआघाडी 'हिरव्या व्हायरस'चे शिकार - योगी आदित्यनाथ

काँग्रेस आणि महाआघाडी 'हिरव्या व्हायरस'चे शिकार - योगी आदित्यनाथ

आदित्यनाथ यांनी या आधी अली आणि बजरंगबली अशी तुलना केली होती त्यावरूनही वाद निर्माण झाला होता.

  • Share this:

लखनऊ10 एप्रिल : आपल्या चिथावणीखोर वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आणखी एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरला आहे. त्यावर टीका करताना आदित्यनाथ यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं.

योगी म्हणाले, राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरत असताना सगळीकडे हिरवे झेंडे दिसत होते. या हिरव्या व्हायरसनेच देशाची फाळणी केली होती. या फाळणीला जबाबदार असलेल्या मुस्लिम लीग या पक्षाची काँग्रेससोबत युती आहे. त्यामुळे पहिल्यापासूनच काँग्रेस आणि महाआघाडीला या 'हिरव्या व्हायरस'ने ग्रासले आहे असा अशी टीकाही त्यांनी केली.

हिरवा रंग हा मुस्लिमांसाठी अतिशय पवित्र समजला जातो. त्यामुळे आदित्यनाथ यांची टीका जातीय भावनेतून झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. बहुजन समाजपक्षाच्या नेत्या मायावती यांनी मुस्लिम समाजाला मतदान करण्याचं आव्हान केलं होतं. आदित्यनाथ यांनी मायावतींवरही टीका केली. मुस्लिम आणि दलित कधीही एकत्र येऊ शकत नाहीत असं मत त्यांनी व्यक्त केलं.

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षालाही हिरव्या व्हायरसने ग्रासलं आहे असंही ते म्हणाले. आदित्यनाथ यांनी या आधी अली आणि बजरंगबली अशी तुलना केली होती त्यावरूनही वाद निर्माण झाला होता. मतांच्या ध्रुवीकरणासाठीच योगींनी असं वादग्रस्त वक्तव्य केलं असंही बोललं जातंय.

अशी वादग्रस्त वक्तव्य केल्यांमुळे योगी आदित्यनाथ कायम वादात सापडतात. या आधीही आदित्यनाथांमुळे अनेकदा वाद झाले आहेत. निवडणुका असल्याने जाणीवपूर्वक असं बोललं जातं अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

First published: April 10, 2019, 9:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading