मराठी बातम्या /बातम्या /देश /

IND vs PAK: चुकीला माफी नाही! पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्यांवर होणार देशद्रोहाची कारवाई

IND vs PAK: चुकीला माफी नाही! पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्यांवर होणार देशद्रोहाची कारवाई

पाकिस्तानच्या(IND vs PAK) विजयाचा जल्लोष करणाऱ्यांवर देशद्रोहाची कारवाई करण्याची सूचना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांनी दिल्या आहेत.

पाकिस्तानच्या(IND vs PAK) विजयाचा जल्लोष करणाऱ्यांवर देशद्रोहाची कारवाई करण्याची सूचना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांनी दिल्या आहेत.

पाकिस्तानच्या(IND vs PAK) विजयाचा जल्लोष करणाऱ्यांवर देशद्रोहाची कारवाई करण्याची सूचना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांनी दिल्या आहेत.

  • Published by:  Dhanshri Otari

दुबई, 28 ऑक्टोबर: टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्ताननं भारतावर १० गडी राखून दणदणीत (IND vs PAK) विजय मिळवला. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभूत झाला. त्यानंतर पाकिस्तानसह भारतातही अनेक ठिकाणी भारताचा (Team India)पराभव झाल्यानंतर जल्लोष साजरा केल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, जल्लोष करणाऱ्यांवर देशद्रोहाची कारवाई करण्यात आली (yogi adityanath sedition charges celebrating pakistan win t20 world cup)असल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनाचा हवाला देत वृत्तसंस्था एएनआयने म्हटले आहे की, 24 ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करताना शेजारील देशाला पाठिंबा दिल्याच्या प्रकरणी यूपी पोलिसांनी सात जणांना अटक केली. पाच जिल्ह्यातून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जम्मू काश्मीरमधीली तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा केल्याचा आरोप असलेल्या तीन काश्मिरी विद्यार्थ्यांविरोधात आग्रा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गदारोळानंतर आग्रा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनाही व्यवस्थापनाने निलंबित केले होते. काश्मीरमधील तीन विद्यार्थ्यांनी आरबीएस इंजिनिअरिंग टेक्निकल कॅम्पसमध्ये पाकिस्तानच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला होता. विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअॅपवर स्टेटस टाकून पाकिस्तानच्या विजयाचे समर्थन करत देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे.

राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका शिक्षिकेनं पाकिस्तानच्या विजयानंतर व्हॉट्स ऍप स्टेटस टाकत आनंद व्यक्त केला. या शिक्षिकेला खासगी शाळेनं नोकरीवरून कमी केलं आहे. तसेच, सामन्यानंतर पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्याबद्दल जम्मू-काश्मीरच्या सांबा येथे आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले.

यापूर्वी, वीरेंद्र सेहवागने ट्विट करत 'दिवाळीमध्ये फटाके वाजवण्यावर बंदी आहे, पण तरीही काल पाकिस्तानच्या विजयानंतर भारताच्या काही भागांमध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. ते क्रिकेटच्या विजयां सेलिब्रेशन करत होते. मग दिवाळीमध्ये फटाके फोडले तर काय होतं? हा दांभिकपणा का? सगळं ज्ञान तेव्हाच का आठवतं?' असा सवाल सेहवागने उपस्थित केला होता. तसेच, सेहवागसोबत अनेकांनी या घटनेवर आक्षेप नोंदवला होता.

First published:

Tags: India vs Pakistan, T20 league, T20 world cup, Yogi Aadityanath