'अयोध्येबद्दल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अमलबजावणी करू'- योगी आदित्यनाथ

'अयोध्येबद्दल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अमलबजावणी करू'- योगी आदित्यनाथ

अयोध्येतल्या रामजन्मभूमी वादाबद्दल सुप्रीम कोर्ट जो निर्णय घेईल त्या निर्णयाची आम्ही अमलबजावणी करू, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : अयोध्येतल्या रामजन्मभूमी वादाबद्दल सुप्रीम कोर्ट जो निर्णय घेईल त्या निर्णयाची आम्ही अमलबजावणी करू, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली. योगी आदित्यनाथ यांनी या मुलाखतीत अयोध्या, लोकसंख्या नियंत्रण आणि हिंदी ही राष्ट्रभाषा करण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली.

अयोध्येतल्या वादाबद्दल सुप्रीम कोर्टात रोज सुनावणी होते आहे. या खटल्यात तथ्याच्या आधारे एक सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी आशा आहे, असं ते म्हणाले.

अयोध्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मध्यस्थ नेमण्याचा निर्णय दिला होता. मध्यस्थांच्या माध्यमातून या वादावर तोडगा काढण्यासाठी मुस्लीम पक्ष तयार झाला असता तर बरं झालं असतं, असं ते म्हणाले. कोर्टाकडून या वादावर कायमचा तोडगा काढणारा निर्णय येईल, अशी अपेक्षा आहे, अशीही टिप्पणी त्यांनी केली.

लोकसंख्येवर नियंत्रण ठेवल्यास नैसर्गिक स्रोतांची योग्य विभागणी होईल,असं योगी आदित्यनाथ म्हणाले. आपल्याकडे जे मनुष्यबळ आहे त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील.तुम्ही कितीही विकास केला आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले नाहीत तर धार्मिक लोकसंख्येची समस्याही उद्भवू शकते,असा इशारा त्यांनी दिला.

शरद पवारांना शेजारचा पाकिस्तान देश आवडतो, यापेक्षा दुर्दैवी काय- PM मोदी

योगी आदित्यनाथ म्हणाले, जर लोकसंख्येला आळा घातला नाही तर विकास योजनांचा लाभ सगळ्यांना मिळू शकणार नाही. योग्य वेळ आली तर या मुद्द्यावरही सरकार निर्णय घेईल.

दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये स्थानिक भाषेबरोबरच हिंदी भाषाही पर्यायी भाषा म्हणून ठेवली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि प्रत्येक राष्ट्रभाषेचा सन्मान झालाच पाहिजे. जी राष्ट्रीय सन्मानाची प्रतीकं आहेत त्यांचा योग्य सन्मान झालाच पाहिजे, असंही ते म्हणाले.

=============================================================================

VIDEO: 'शरद पवार तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती', पंतप्रधान मोदींचं शरसंधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 04:21 PM IST

ताज्या बातम्या