S M L

'अतिआत्मविश्वास नडला', पोटनिवडणुकीतल्या पराजयानंतर आदित्यनाथांची कबुली

गोरखपूर हा मतदारसंघ तर खुद्द योगी आदित्यनाथ. तर फुलपूरची जागा उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांची होती. पण सपा-बसपानं अनपेक्षित युती करत भाजपला धूळ चारली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 14, 2018 07:32 PM IST

'अतिआत्मविश्वास नडला', पोटनिवडणुकीतल्या पराजयानंतर आदित्यनाथांची कबुली

14 मार्च : अतिआत्मविश्वास नडला, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ही कबुली बरंच काही सांगून जाते. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशातल्या पोटनिवडणुकीत दोन्ही जाहा सपानं पटकावल्यात. गोरखपूर हा मतदारसंघ तर खुद्द योगी आदित्यनाथ. तर फुलपूरची जागा उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांची होती. पण सपा-बसपानं अनपेक्षित युती करत भाजपला धूळ चारली आहे.

बिहारमध्येही तीन जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्यातल्या अररिया आणि जहानाबादची लढाई राष्ट्रीय जनता दलानं जिंकली आहे. दोन जागा लढवून भभुआची एकच जागा मिळवण्यात भाजपला यश आलं आहे. विरोधकांप्रमाणेच भाजपचा हा पराभव मित्रपक्षांसाठी महत्त्वाचा आहे.

उत्तर प्रदेशात 2017 मधल्या विधानसभा निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर अवघ्या एका वर्षात भाजपला हा बसलेला मोठा धक्का आहे. त्रिपुरातल्या विजयोत्सवाला गालबोट लावणारा आहे. एकत्र आलो तर भाजपचा विजयरथ रोखता येईल, हा आत्मविश्वास विरोधकांमध्ये यामुळे वाढू शकतो. पण, काँग्रेस मात्र यशासाठी अजूनही चाचपडत आहे, याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 07:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close