...आणि योगींना अश्रू अनावर झाले

...आणि योगींना अश्रू अनावर झाले

गोरखपूर घटनेतील दोषींवर अशी कारवाई करेन की ते अशा घटनांमध्ये केलेल्या कारवाईत माईलस्टोन ठरेल असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलंय.

  • Share this:

13 आॅगस्ट : गोरखपूर घटनेतील दोषींवर अशी कारवाई करेन की ते अशा घटनांमध्ये केलेल्या कारवाईत माईलस्टोन ठरेल असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलंय. गोरखपूरच्या बाबा राघव दास रूग्णालयात झालेल्या बालकांच्या मृत्यूंनंतर योगी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी या रूग्णालयाला आज भेट दिली. त्यानंतर पत्रकार परिषद घेताना योगींना अश्रू अनावर झाले.

योगींनी या प्रकरणाची मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सखोल चौकशी करणार असल्याची माहिती दिली. ही दुर्घटना ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्यानेच झाल्याचं त्यांनी मान्य केलं. गोरखपूरच्या या रूग्णालयातील भोंगळ कारभारावर अनेकदा योगींनी संसदेतही वाचा फोडली होती. या घटनेकडे पंतप्रधान मोदींचंही विशेष लक्ष असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. तर पीएमओने योगी आदित्यनाथ यांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2017 04:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading