News18 Rising India : गणिताचा विद्यार्थी अजयमोहन बिष्ट असा झाला संन्यासी आणि मग उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री

  • Share this:

अजयमोहन बिश्त नावाचा विद्यार्थी उत्तर प्रदेशातल्या एका विद्यापीठात गणिताचा हुशार विद्यार्थी होता. त्याचा योगी बनण्यापर्यंतचा आणि पुढे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होण्याचा हा प्रवास उलगडणार आहे न्यूज18 नेटवर्कच्या दिल्लीत होणाऱ्या रायझिंग इंडिया 2019 या समिटमध्ये.

रायझिंग इंडिया 2019 या परिषदेमध्ये काही पंतप्रधान नरेंद्र मोदी सामील होणार आहेत. त्याबरोबरच काही राज्यांचे मुख्यमंत्रीसुद्धा विकासाच्या मुद्द्यावर आपापले विचार आणि कार्यक्रम यावर चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्यापैकी एक.

आताचा उत्तराखंड म्हणजे तेव्हाच्या उत्तर प्रदेशात 5 जून 1972 मध्ये पौडी जिल्ह्यात पचूंर नावाच्या गावात अजयमोहन यांचा जन्म झाला. बिष्ट वाचा तो राजपूत परिवार होता.

अजयमोहन बिश्त यांचं प्राथमिक शिक्षण झालं टिहरीला. त्यानंतर 1989 मध्ये ऋषिकेशच्या भरत इंटर कॉलेजमधून त्यांनी इंटरमीजिएट परीक्षा दिली.

1990मध्ये कॉलेजमध्ये असताना अजयमोहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे ओढला गेला. 1992 गढवाल युनिव्हर्सिटीमधून गणित विषयात BSc. झाला.

1993मध्ये MScचा अभ्यास सुरू असतानाच गुरू गोरखनाथ यांचा अभ्यास करण्याच्या हेतूने अजयमोहन बिश्त गोरखपूरला आला आणि इथलाच झाला.

गोरक्षनाथ पीठाचे महंत अवैद्यनाथ यांची नजर या तरुण मुलावर पडली. 1994ला सांसारिक मोहमाया सोडून पूर्णपणे संन्यास घेतला आणि अजयमोहन यांचे योगी आदित्यनाथ झाले.

1998ला योगी आदित्यनाथ प्रथम गोरखपूरहून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि जिंकलेही. त्या वेळी ते केवळ 26 वर्षांचे होते.

2002मध्ये योगी आदित्यनाथ यांनी हिंदू युवा वाहिनी तयार केली. दरम्यान 2004च्या लोकसभा निवडणुकीसाठी ते पुन्हा उभे राहिले आणि सलग तिसऱ्यांदा जिंकून आले.

7 डिसेंबर 2008 रोजी योगी आदित्यनाथ यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, ज्यातून ते थोडक्यात बचावले. 2009मध्ये लोकसभेला पुन्हा उभे राहिले आणि 2 लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून आले.

2014मध्ये सलग पाचव्यांदा योगी आदित्यनाथ लोकसभेवर निवडून आले आणि त्यावेळी मताधित्य 2 लाखांवर होतं. आदित्यनाथांचा उत्तर प्रदेशातला बोलबाला प्रचंड वाढला.

2017मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निडणुकीच्या वेळी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी योगी आदित्यनाथ यांच्या भरवशावर त्यांच्याकडून राज्यभर प्रचार करून घेतला. भाजपला उत्तर प्रदेशात प्रचंड मोठा विजय मिळाला आमि 19 मार्च 2017 रोजी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करण्यावर शिक्कामोर्तब झालं. 20 मार्च 2017ला त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 04:12 PM IST

ताज्या बातम्या