'हिंदी' देशाचं कुंकू हे 'बापूं'चं मत, योगी आदित्यनाथ यांनी केली अमित शहांची पाठराखण

'हिंदी' देशाचं कुंकू हे 'बापूं'चं मत, योगी आदित्यनाथ यांनी केली अमित शहांची पाठराखण

स्थानिक भाषेसोबतच हिंदीचाही पुरस्कार केला तर ते अधिक उपयुक्त होईल. उलट इतर भाषिक नागरिकांनी हिंदी शिकली तर त्याला रोजगारासाठी जास्त संधी निर्माण होतील.

  • Share this:

नवी दिल्ली 18 सप्टेंबर : हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा व्हावी असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah ) यांनी व्यक्त केल्यानंतर देशभर वादळ निर्माण झालं. दक्षिणेतल्या अनेक राज्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी त्याला विरोध केला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांनी अमित शहांची पाठराखण केलीय. हिंदी(Hindi) ही भारतात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. त्यामुळं ती भाषा शिकलात तर तुम्हाला जास्त संधी निर्माण होतील. हिंदी ही देशाचं कुंकू आहे असं मत खुद्द महात्मा गांधी यांनीही व्यक्त केलं होतं असा दाखलाही आदित्यनाथ यांनी दिला. News18 Network चे ग्रुप एडिटर राहुल जोशी यांना दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांना घेरण्याची काँग्रेसची योजना, ही आहे उमेदवारांची संभाव्य यादी!

हिंदीच्या वापरासंबंधात बोलताना ते म्हणाले, देशात हिंदी ही देशात सर्वाधिक बोलली जाते. स्थानिक भाषेसोबतच हिंदीचाही पुरस्कार केला तर ते अधिक उपयुक्त होईल. उलट इतर भाषिक नागरिकांनी हिंदी शिकली तर त्याला रोजगारासाठी जास्त संधी निर्माण होतील. त्याचं उदाहण सांगताना ते म्हणाले, तामिळनाडूच्या युवकाला दिल्लीत काम करण्याचा अधिकार नाही का? लखनऊ, भोपाळ अशा ठिकाणी तो काम का मिळवू शकत नाही. हिंदी भाषिक राज्यांमध्येही काम करण्याचा त्याला अधिकार आहे. हिंदी बरोबरच त्याला जेवढ्या जास्त भाषा येतील तेवढ्या त्याला जास्त संधी उपलब्ध होतील असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

अयोध्याप्रकरणी नोव्हेंबरमध्ये निकाल? SCकडून युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी डेडलाईन

अमित शहांच्या वक्तव्याला डिएमकेचे एम. के स्टॅलिन, तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी विरोध केला होता. या विरोधानंतर अमित शहा यांनी त्याचं स्पष्टीकरणही दिलं होतं. ते म्हणाले, हिंदीची सक्ती करावी असं मी कधीही म्हणालो नाही. मी फक्त एवढीच विनंती केली की मातृभाषेबरोबरच हिंदी ही दुसरी भाषा म्हणून शिकली पाहिजे. मीही गुजरात सारख्या अहिंदी भाषिक राज्यातून येतो असंही त्यांनी सांगितलं होतं. ज्यांना राजकारण करायचं त्यांनी ते खुशाल करावं. मात्र त्या आधी माझं भाषण त्यांनी लक्षपूर्वक ऐकावं असं ते म्हणाले होते.

पाकच्या बॅट कमांडोंचा घुसखोरीचा कट भारतीय लष्कराने उधळला, पाहा VIDEO

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, इतर भाषेसोबत हिंदीचीही वाढ होवू शकते. सर्व स्थानिक भाषांचा विकास करणं ही आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे असंही ते म्हणाले. न्यायालयांनीही कामाजात इंग्रजीप्रमाणेच स्थानिक भाषेचाही वापर करायला हवं असं मतही त्यांनी व्यक्त केलं. तामिळनाडू किंवा केरळमध्ये जर त्या त्या भाषांमधून न्यायालयाचं कामकाज चाललं तर स्थानिक लोकांनाही ते जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. काही लोकांना फक्त प्रत्येक गोष्टीला विरोधच करायचा असतो असा टोलाही त्यांनी विरोध करणाऱ्यांना लगावला.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 18, 2019, 10:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading