News18 Lokmat

'काँग्रेसनं दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ दिली; आम्ही बॉम्बनं हल्ला केला'

योगी आदित्यनाथ यांनी सॅम पित्रोदा यांच्या विधानावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 08:10 PM IST

'काँग्रेसनं दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ दिली; आम्ही बॉम्बनं हल्ला केला'

नवी दिल्ली, 24 मार्च : लोकसभा निवडणुकीकरता जोरदार प्रचाराला सुरूवात झाली आहे. काँग्रेस - भाजपनं आता परस्परांना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील 'काँग्रेसनं दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ दिली; आम्ही बॉम्बनं हल्ला केला' अशा शब्दात काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे. 'इंडियन एक्सप्रेस'शी बोलत असताना त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून आता प्रचारामध्ये राष्ट्रीय सुरक्षा हा मुद्दा देखील चर्चिला जात आहे.

दरम्यान, यावेळी योगी आदित्यनाथ यांनी सॅम पित्रोदा यांचा देखील समाचार घेतला. सॅम पित्रोदा यांनी भारतानं 26 फेब्रुवारी रोजी केलेल्या एअर स्ट्राईकवर शंका घेत पुराव्यांची मागणी केली होती. शिवाय, दहशतवादी हल्ल्यासाठी संपूर्ण देशाला जबाबदार कसं धरणार? असा सवाल देखील केला होता. सॅम यांची देशाला लाज वाटत असल्याचं म्हणत त्यांनी सॅम पित्रोदा यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला.


धक्कादायक निकाल! भाजपच्या या केंद्रीय मंत्र्यांचा झाला होता 2014मध्ये पराभव


Loading...

काय म्हणाले होते सॅम पित्रोदा?

'मला हल्ल्यांबाबत जास्त काही माहीत नाही. पण, हल्ले होत राहतात. मुंबईवर देखील हल्ला झाला होता. त्यावेळी देखील एअर स्ट्राईक करता आला असता. पण, ते चुकीचं होतं. माझ्या मताप्रमाणे जगात वागण्याची ही पद्धत बरोबर नाही.'

'काही लोक येतात आणि हल्ला करतात. त्यासाठी आपण संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार कसं ठरवणार?' असा सवाल यावेळी सॅम पित्रोदा यांनी केला होता. तसेच यावेळी त्यांनी 'एअर स्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी ठार झाले म्हणता. त्याला पुरावा काय?' असा सवाल देखील केला होता.


VIDEO: पार्थ पवारांचा अनोखा अंदाज; गाण्यावर धरला ठेका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 07:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...