योगी महाराष्ट्रात जिंकले, युपीत हरले!

योगी महाराष्ट्रात जिंकले, युपीत हरले!

  • Share this:

मुंबई, ता. 31 मे: पोटनिवडणूकीत देशभर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते महाराष्ट्रातल्या पालघर आणि उत्तर प्रदेशातल्या कैराना लोकसभा मतदार संघांच्या निकालाकडे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोनही जागांवर जोरदार प्रचार केला. पालघरची जागा भाजप आणि शिवसेनेनं प्रतिष्ठेची केल्यानं दोनही पक्षांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती.

योगी आदित्यनाथ यांनी विरारमध्ये प्रचारसभा घेऊन थेट शिवसेनेला अंगावर घेतलं पण बाळासाहेबांचं मात्र तोंडभरून कौतुक केलं. याचा फायदा भाजपला झाल. विरार, बोईसर या पट्ट्यात उत्तर भारतीय मतदारांचं प्रमाण जास्त असल्यानं भाजपनं योगींना आणून उत्तर भारतीय आणि हिंदुत्वाचं कार्ड खेळलं आणि पालघरची जागा मिळाल्याने त्यात त्यांना यशही मिळलं.

कैरानाच्या निकालाने भाजपला धक्का

पण आपलच गृहराज्य असलेल्या उत्तर प्रदेशात मात्र विरोधकांच्या ऐकीच्या बळानं मात्र योगींना धक्का दिला. भाजपचे खासदार हुकूम सिंह यांच्या निधनाने ही जागा खाली झाली होती. भाजपने हुकूम सिंह यांची मुलगी मृगांका सिंह यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सुम हसन यांना सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील दिग्गज मंत्र्यांनी कैरानात दमदार प्रचार केला मात्र विरोधकांच्या ऐकीमुळं तिथं कमळ फुललं नाही. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत या निकालामुळं विरोधीपक्षांना बळ मिळणार असून सर्व पक्ष एकत्र आले तर भाजपला हरवू शकतो हे कैराना आणि गोरखपूरनं दाखवून दिलं आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2018 03:56 PM IST

ताज्या बातम्या