कुस्तिपटू योगेश्वर दत्तही भाजपकडून उतरणार निवडणुकीच्या आखाड्यात

कुस्तिपटू योगेश्वर दत्तही भाजपकडून उतरणार निवडणुकीच्या आखाड्यात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश्वर हा सोनीपतमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 22 मार्च : भाजपमध्ये होत असलेलं इनकमिंग सुरूच आहे. क्रिकेटपटू गौतम गंभीर नंतर आता प्रसिद्ध कुस्तिपटू योगेश्वर दत्तही भाजपकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. योगेश्वर हरियाणातून निवडणूक लढवण्यास तयार असून अजुन त्याचा मतदारसंघ ठरलेला नाही.

भाजपच्या हरियाणा निवडणूक समितीने योगेश्वरच्या नावावर चर्चा केलीय. त्याच्या नावाचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक समितीला पाठवला आहे. केंद्रीय समिती त्यावर अंतिम निर्णय घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश्वर हा सोनीपतमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे.

तर भाजप त्याला रोहतक मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. 2014मध्ये रोहतकमधून काँग्रेसचे दीपेंद्र हुड्डा हे मोदी लाटेतही निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध योगेश्वरला उतरविल्यास चांगली लढत होईल असं भाजपच्या नेत्यांच मत आहे.

गौतम गंभीरही भाजपमध्ये

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीत त्याने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या उपस्थितीत त्याने प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून गंभीरच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सुरू होती. लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आता उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने 184 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर पुढच्या यादीत दिल्लीतील 3 उमेदवार बदलण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील सध्याच्या खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर दिल्लीतून लढण्याची शक्यता आहे. गौतम गंभीर सोशल मीडियावर अॅक्टिव असतो. त्याने आतापर्यंत दिल्लीतील आप सरकारवर अनेकदा टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 10:21 PM IST

ताज्या बातम्या