योगा ख्रिस्ती धर्माच्या सिद्धांताविरूद्ध -केरळातील चर्चेसचा रिपोर्ट

योगा ख्रिस्ती धर्माच्या सिद्धांताविरूद्ध -केरळातील चर्चेसचा रिपोर्ट

या रिपोर्टमध्ये योगसाधना करू नका असा अप्रत्यक्षपणे संदेश देण्यात आला आहे. या संदेशासाठी पोपच्या विधानांचे दाखलेही घेण्यात आले आहेत. एकीकडे केंद्रातलं मोदी सरकार देशभर योगाच्या प्रचार प्रसारासाठी प्रयत्नशील आहे .योगाचा बिझनेस भारतापेक्षा जास्त अमेरिकेत फोफावलाय

  • Share this:

05 एप्रिल: योगा करणं हे ख्रिस्ती धर्माच्या मताच्या विरूद्ध आहे असं धक्कादायक विधान केरळातील चर्चेसच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलंय. तसंच हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी योगाचा वापर संघ परिवार करतंय असा आरोपही या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय.

या रिपोर्टमध्ये योगसाधना  करू नका असा अप्रत्यक्षपणे संदेश देण्यात आला आहे.  या संदेशासाठी पोपच्या विधानांचे दाखलेही घेण्यात आले आहेत. एकीकडे केंद्रातलं मोदी सरकार देशभर योगाच्या प्रचार प्रसारासाठी प्रयत्नशील आहे .योगाचा बिझनेस भारतापेक्षा जास्त अमेरिकेत फोफावलाय. पण अशा परिस्थितीत चर्चने मात्र योगाला धर्माविरोधी ठरवून त्याच्या तत्वज्ञानात्मक बाजूवरच घाव घातलाय. इश्वराशी एक होण्यासाठी योगसाधना आहे पण ईश्वर आणि भक्त कधीच एक होऊ शकत नाहीत असं स्पष्टपणे या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

यावरून चर्चवर सगळीकडून टीकेची झोड उठत असताना  चर्चने मात्र हा रिपोर्ट दोन वर्ष जुना असल्याच स्पष्टीकरण दिलंय.

First published: April 5, 2018, 6:07 PM IST

ताज्या बातम्या