पुणे, 16 मे : मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या अभिनेता संजय दत्तची सुटका ही केंद्र सरकारला न विचारता करण्यात आल्याची माहिती RTIमधून समोर आली आहे. राजीव गांधी हत्या प्रकरणामध्ये शिक्षा भोगत असलेल्या ए.जी. पेरारीवलननं माहिती अधिकारातंर्गत माहिती मागवल्यानंतर हा खुलासा झाला आहे. या प्रकरणामध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे जेलच्या नियमानुसार संजय दत्तची सुटका करण्यात आल्याचं येरवडा जेल प्रशासनानं म्हटलं आहे. पेरारीवलनच्या वकिलांनी 'द हिंदु' या वृत्तपत्राशी बोलताना याबाबतची माहिती दिली.
विंग कमांडर अभिनंदन यांना ISIनं केली होती मारहाण; 40 तास केलं टॉर्चर
काय आहे प्रकरण
राजीव गांधी हत्या प्रकरणातील गुन्हेगार ए.जी. पेरारीवलननं संजय दत्तच्या सुटकेबाबत RTI दाखल केला होता. यावेळी उत्तरादाखल येरवडा जेलचे डेप्युटी सुपरीडेंट यांनी संजय दत्तच्या सुटकेबाबत केंद्र किंवा राज्य सरकारला कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती अशी माहिती दिली.
संजय दत्तची सुटका ही महाराष्ट्र जेल नियमांनुसार झाली. उत्तरामध्ये गुन्हेगाराची चांगली वागणूक असल्यास केंद्र किंवा राज्य सरकारचा सल्ला घेतला जात नसल्याचं जेल प्रशासनानं म्हटलं आहे.
'...तर या कारणास्तव फक्त VVPATची मतं धरली जातील ग्राह्य'
संजयला जेलमध्ये पाठवण्याचा उद्देश नाही
संजय दत्तला आर्म अॅक्ट अंतर्गत शिक्षा झाली होती. दरम्यान, संजय दत्ताला पुन्हा जेलमध्ये पाठवण्याचा उद्देश नसल्याचं पेरारीवलननं म्हटलं आहे. दोघांच्या केसमध्ये 'अॅक्ट ऑफ टेरर'चा उल्लेख करण्यात आला होता. पण, संजय दत्तची वेळेच्या आधी सुटका करून दोघांना वेगळा न्याय दिला जात असल्याचं पेरारीवलननं म्हटलं आहे.
दरम्यान, संजय दत्तची सुटका ही नियमांना डावलून झाली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये सीबीआयनं तपास केला होता. पण, शिक्षा माफ करताना मात्र दोघांना वेगळी वागणूक दिल्याचं पेरारीवलनच्या वकीलानं 'द हिंदु' या वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं.
VIDEO: मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला मारहाण करत हिसकावली सोनसाखळी