काँग्रेसने खोटी कागदपत्रं सादर केली, भ्रष्टाचाराच्या आरोपांना येडियुरप्पा यांचं उत्तर

काँग्रेसने खोटी कागदपत्रं सादर केली, भ्रष्टाचाराच्या आरोपांना येडियुरप्पा यांचं उत्तर

भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपच्या मंत्र्यांना 1800 कोटी रुपये दिले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यावर, येडियुरप्पा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने लोकसभेच्या लढाईत आधीच हार खाल्ली आहे. मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे काँग्रेस नेते निराश झाले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 मार्च : भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपच्या मंत्र्यांना 1800 कोटी रुपये दिले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यावर, येडियुरप्पा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने लोकसभेच्या लढाईत आधीच हार खाल्ली आहे. मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे काँग्रेस नेते निराश झाले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने 'कॅरावान' चा दाखल देऊन सादर केलेली कागदपत्रं खोटी आणि बनावट आहेत, असंही ते म्हणाले.

रविशंकर प्रसाद यांचीही टीका

काँग्रेसचे नेते सॅम पिट्रोडा आणि प्रवक्ते रणदीप सुरेजवाला यांनी शुक्रवारी भाजपवर आरोप केले. सॅम पिट्रोडा यांनी भारताच्या हवाई हल्ल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले तर सुरजेवाला यांनी 'कॅरावान' मासिकाचा हवाला देऊन भाजप नेते येडियुरप्पा आणि भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचा समाचार घेतला. काँग्रेसला पराभवाची भीती वाटतेय म्हणून काँग्रेस असे खोटेनाटे आरोप करत सुटलं आहे, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार होते म्हणून आम्ही सकाळपासून वाट बघत होतो. पण ही पत्रकार परिषद झालीच नाही. अखेर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी 'कॅरावान' मासिकाचा दाखला देत भाजपवर बिनबुडाचे आरोप केले, असं रविशंकर प्रसाद म्हणाले.

त्या डायरीवर येडियुरप्पांची सही नाही

येडियुरप्पा यांनी कोणतीही डायरी लिहिली नाही, त्यावर त्यांची सहीदेखील नाही. असं असताना ही कागदपत्रं पुरावा म्हणून सादर होऊच शकत नाहीत, असं त्यांनी सांगितलं.

काँग्रेसचे नेते डी. शिवकुमार यांच्यावर 2017 मध्ये छापा टाकण्यात आला होता तेव्हा या छाप्यामध्ये ही डायरी पकडली गेली होती.या डायरीवर कुठेही येडियुरप्पा यांचं नाव नव्हतं आणि सहीसुद्धा नव्हती. ही कागदपत्रं फोटोकॉपी होती पण डी. शिवकुमार यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी हे आरोप केले, असंही रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

=============================================================================================

भाजपचे 182 उमेदवार लोकसभेच्या आखाड्यात, UNCUT पत्रकार परिषद

First published: March 22, 2019, 5:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading