'Air Strike नंतर मोदी लाट, भाजप जिंकणार 22 जागा'

'Air Strike नंतर मोदी लाट, भाजप जिंकणार 22 जागा'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अत्यंत धाडसाने पाकिस्तानला धडा शिकवला आणि पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला.

  • Share this:

नवी दिल्ली, २८ फेब्रुवारी २०१९- भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यामुळे कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट आली आहे, असं कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे. भाजपला कर्नाटकमध्ये 28 पैकी 22 जागा मिळतील, या हल्ल्यामुळे तरुण वर्गामध्ये नवा जोश आला आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अत्यंत धाडसाने पाकिस्तानला धडा शिकवला आणि पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. पुलवामा हल्ल्यानंतर मोदी जे बोलले होते ते त्यांनी करून दाखवलं. त्यांच्या या कृतीचं विरोधी पक्षांनीही स्वागत केलं आहे, याची आठवण येडियुरप्पा यांनी करून दिली.

येडियुरप्पा यांच्या या विधानावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी टीका केली आहे. भाजपने मतांसाठी शहिदांच्या बलिदानाचा फायदा उठवण्याची रणनीती आखली आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.  अशा प्रकारचं राजकारण फक्त देशद्रोहीच करू शकतात, असा आरोप करत याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काय म्हणणं आहे, असाही सवाल त्यांनी केला.

कर्नाटकमध्ये भाजपकडे लोकसभेच्या 16 तर काँग्रेसकडे 10  जागा आहेत. कुमास्वामी यांच्या जेडीएस पक्षाकडे 2 जागा आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस या पक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी युती केली आहे. या दोघांमध्ये जागावाटपासाठी चर्चा सुरू आहे. जेडीएसने काँग्रेसकडे 10 ते 12 जागांची मागणी केली आहे. पण हे जागावाटप योग्यतेनुसार व्हावं, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.

SPECIAL REPORT : लादेनसारखाच मसूदचा पण होईल का खात्मा?

First published: February 28, 2019, 12:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading