News18 Lokmat

Year Ender 2018: काँग्रेसमुक्तीऐवजी कमळच कोमेजलं, यावर्षी असा बदलला भारताचा राजकीय नकाशा

भारत काँग्रेसमुक्त करण्याच्या भाजपच्या इराद्यालाही सुरुंग लागला आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 29, 2018 09:52 AM IST

Year Ender 2018: काँग्रेसमुक्तीऐवजी कमळच कोमेजलं, यावर्षी असा बदलला भारताचा राजकीय नकाशा

मुंबई, 28 डिसेंबर : देशातील पाच विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला. यावेळी केंद्रातील सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का बसला. तसंच भारत काँग्रेसमुक्त करण्याच्या भाजपच्या इराद्यालाही सुरुंग लागला आहे.

देशातील पाच राज्यांच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला आहे. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला आहे. त्यानंतर या तिन्ही राज्यांत काँग्रेसने मुख्यमंत्रिपद मिळवलं आहे. तर तेलंगणा आणि मिझोराममध्ये जनतेनं प्रादेशिक पक्षांना साथ दिल्याचं पाहायला मिळालं.

कशी आहे भारताची राजकीय स्थिती?

भाजपची आता भारतातील 16 राज्यांत सत्ता आहे. यामध्ये काही ठिकाणी तिथल्या प्रादेशिक पक्षांसोबत युती करून भाजप सत्तेत आहे. तर काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीची पाच राज्यांमध्ये सत्ता आहे.


Loading...

मे 2014 मध्ये भाजप केंद्रात सत्तेत आला तेव्हा त्यांची सात राज्यांत सत्ता होती. त्यानंतर भाजपने मोठी मुसंडी मारत अरूणाचल प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या राज्यांत सत्ता मिळवली.

दुसरीकडे, 2018 हे वर्ष काँग्रेससाठी सकारात्मक ठरलं. कारण यावर्षी काँग्रेसने भाजपकडून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही महत्त्वाची राज्य हिसकावून घेतली. पंजाब, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात काँग्रेसने सत्ता काबीज केली आहे.

काँग्रेस आणि भाजप या दोन मोठ्या राष्ट्रीय पक्षांना शह देत सात राज्यांत सत्ता मिळवण्यात प्रादेशिक पक्ष यशस्वी ठरले आहेत. आंध्र प्रदेश, केरळ, ओडिशा, मिझोराम, तेलंगणा, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांत प्रादेशिक पक्ष सत्तेवर आहेत, तर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू आहे.


VIDEOS: मुंबईत आता स्वस्तात मिळणार पॉड हॉटेल, ही आहे खासियत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 29, 2018 06:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...