हैदराबाद स्फोटातील प्रमुख दहशतवाद्याची नाटकं,कुकर देत नाहीत म्हणून जेलमध्ये उपोषण

हैदराबाद स्फोटातील प्रमुख दहशतवाद्याची नाटकं,कुकर देत नाहीत म्हणून जेलमध्ये उपोषण

यासिन भटकळनं आता तिहार जेलमध्ये उपोषणाची हाक दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 एप्रिल : फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या यासिन मलिकनं आता इंडकशन कुकरसाठी उपोषणाला सुरूवात केली आहे. यासिन भटकळ हा 2013मध्ये हैद्राबादमध्ये झालेल्या ब़ॉम्बस्फोटातील प्रमुख आहे. 2016मध्ये त्याला न्यायालयानं फाशीची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, यासीन सध्या तिहार जेलमध्ये असून त्यांना आता कुख्यात गुन्हेगारांसह उपोषणाला सुरूवात केली आहे. 'हिंदुस्तान टाईम्स'नं याबाबतंच वृत्त दिलं आहे.कैद्यांना पुन्हा इंडक्शन कुकर मिळावा यासाठी यासिन भटकळनं दोन दिवस उपोषण केलं होतं.

डिसेंबरमध्ये थंडी असते. यावेळी कैद्यांना दूध आणि पाणी गरम करण्यासाठी इंडक्शन कुकर देण्यात येतो. पण, त्यानंतर कैद्यांनी इंडक्शन कुकरचा वापर करत जेवण करायला सुरूवात केली. हे कायद्याचं उल्लंघन आहे. त्यामुळे अखेर कैद्यांकडून इंडक्शन कुकर परत घेण्यात आला. परिणामी, यासिन भटकळनं तुरूंगातील काही कैद्यांनी हाताशी धरत उपोषणाची हाक दिली होती.

इतर कैद्यांची साथ

यासिन भटकळनं गॅगस्टर रवि कपूरसोबत मैत्रि केली. शिवाय, इतर दहशतवाद्यांची देखील यासिनला साथ मिळाली.दरम्यान, यामध्ये यासिन भटकळ हा इतर कैद्यांना उकसवत असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. कैदी आपल्या विषेशाधिकारांचा गैरवापर करत असल्याचं लक्षात आल्यानंतर निर्णय घेतल्याचं तिहारच्या पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

कोण आहे यासिन भटकळ

यासिन भटकळ हा इंडियन मुजाहिद्दीनचा कुख्यात दहशतवादी आहे. 2013मध्ये हैद्राबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटतील यासिन प्रमुख आहे. 2016मध्ये त्याच्यासह पाच जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.सध्या तो तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असून त्यानं आता उपोषणाची हाक दिली आहे. शिवाय, त्याला आता दहशतवाद्यांची देखील साथ मिळत आहे.

VIDEO: बीजिंग ऑलिम्पिक पार्कमध्ये नयनरम्य विद्युत रोषणाई

First published: April 26, 2019, 10:37 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading