RSS कार्यकर्त्याच्या मुलीनं केलं मुस्लिम मुलाशी लग्न, मुलाचं कुटुंब बहिष्कृत

RSS कार्यकर्त्याच्या मुलीनं केलं मुस्लिम मुलाशी लग्न, मुलाचं कुटुंब बहिष्कृत

मुलगी ही सज्ञान असल्याने ती तिचा निर्णय घेण्यास सक्षम असल्याचं मत कोर्टाने व्यक्त केलं आणि हस्तक्षेपास नकार दिलाय.

  • Share this:

यमुनानगर 18 जुलै : हरियाणातल्या यमुनानगर जिल्ह्यात सध्या एक नवा वाद निर्माण झालाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याच्या मुलीने एका मुस्लिम मुलाशी लग्न केल्याचं प्रकरण सध्या तिथे गाजतेय. संघाची पार्श्वभूमी असल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा होतेय. या लग्नाची जास्तच चर्चा होत असल्याने एका मुस्लिम जात पंचायतीने मुलाच्या कुटुंबालाच समाजाबाहेर बहिष्कृत केलं. तर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने दोन्ही कुटुंबांना पोलीस संरक्षण दिलंय.

यमुनानगर इथल्या हमीदा कलनीत संघाचे एक कार्यकर्ते राहतात. एक कट्टर हिंदू संघटना अशी ओळख असल्याने संघाच्या कार्यकर्त्याच्या मुलीने मुस्लिम मुलाशी लग्न करणं हा चर्चेचा विषय ठरलं. काही लोकांनी या लग्नाविरोधात कोर्टाचा दरवाजाही ठोठावला. मात्र मुलगी ही सज्ञान असल्याने ती तिचा निर्णय घेण्यास सक्षम असल्याचं मत कोर्टाने व्यक्त केलं आणि हस्तक्षेपास नकार दिला.

राष्ट्रवादीची 'राष्ट्रीय पक्ष' म्हणून मान्यता जाणार? आयोगाची नोटीस

हा वाद वाढल्याने मुलगी आणि मुलगा एका नातेवाईकांकडे राहायला गेले. पण तिथेही या लग्नाला विरोध होऊ लागला. त्यानंतर मुस्लिम जात पंचायत भरून त्यात मुलाच्या कुटुंबीयांशी समाजाने संबंध तोडून टाकावेत असं फर्मान निघालं. त्यामुळे मुलाचं कुटुंब आता गाव सोडून गेलंय. तर पोलिसांनी दोनही घरांना पोलीस संरक्षण दिलं आहे. समाजाने कितीही प्रगती केली तरी जात, धर्म आणि पंथांवरून होणारे भेद आणि वाद केव्हा संपणार असा प्रश्न आता विचारला जातोय.

कतरिनाच्या फोटोची अर्जुन कपूरने उडवली खिल्ली, मनोरंजन विश्वातील टॉप घडामोडी

कोर्टाची तरुणीला अनोखी शिक्षा

रांची कोर्टाच्या एका निर्णयाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय. या कोर्टानं तरुणीला एक अनोखी शिक्षा दिलीय. ही शिक्षा आहे समाजसेवेची. या तरुणीच्या  फेसबुक पोस्टवरून धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा तिच्यावर आरोप होता. त्यामुळे पवित्र कुराणाच्या पाच प्रती वेगवेगळ्या संस्थांना वाटण्याचा आदेश देत कोर्टानं जामीन देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर सोशल मीडियावरून व्यक्त होताना जबाबदारीचं भान बाळगा अशी ताकिदही कोर्टानं दिलीय.

5 महिन्यात सर्वात महाग झालं पेट्रोल, 'हे' आहेत नवे दर

रांचीच्या रुचा भारती या तरुणीच्या एका पोस्ट वरून वाद निर्माण झाला होता. रुचाविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रारही करण्यात आली होती. तिने जी पोस्ट टाकली होती त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या अशी तक्रार करण्यात आली होती. नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. दोनही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आले. टीका झाल्यानंतर काही दिवसांनी कोर्टाने कुराण वाटण्याच्या निर्णयात बदल केला.

First published: July 18, 2019, 3:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading