दारूच्या नशेत बहिणीसमोर उलगडला आईच्या हत्येचा कट, सुपारी देऊन जन्मदातीला संपवलं!

दारूच्या नशेत बहिणीसमोर उलगडला आईच्या हत्येचा कट, सुपारी देऊन जन्मदातीला संपवलं!

आईचा अचानक मृत्यू झाला असं आरोपी आनंदने आपल्या बहिणीलाही सांगितलं. परंतु, जेव्हा बहीण घटनास्थळी पोहोचली तेव्हा तिला तिच्या आईच्या गळ्यावर निशान दिसले.

  • Share this:

हरियाणा, 29 ऑगस्ट : असं म्हणतात ना 'गुन्हा कधीही लपत नाही' त्यातच एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. एका मुलाने आईची सुपारी देऊन हत्या केली आहे. आनंद असं आरोपी मुलाचं नाव आहे. आनंदने जन्म देणाऱ्या आईची सुपारी देऊन हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आनंदला त्याच्या आईला 1 लाख रुपये द्यायचे होते आणि अशात आनंदने त्याच्याच मित्राला 2 लाखांचं आमिष दाखवत आईची हत्या करण्यासाठी सुपारी दिली.

आईचा अचानक मृत्यू झाला असं आरोपी आनंदने आपल्या बहिणीलाही सांगितलं. परंतु, जेव्हा बहीण घटनास्थळी पोहोचली तेव्हा तिला तिच्या आईच्या गळ्यावर निशान दिसले. त्यानंतर तिने मोबाइलमध्ये त्याचे फोटो काढले. त्यावेळी बहिणी आनंदला काहीही बोलली नाही. पण दारूच्या नशेत आनंद घरी आला आणि त्यानेच तिला सर्व सत्य सांगून टाकलं. हरियाणाच्या यमुनानगरमध्ये जिल्ह्यातली ही धक्कादायक घटना आहे.

दारूच्या नशेत झाली पोलखोल

आईच्या 13 व्याला जेव्हा सर्वजण घरी आले होते. जे घरातून जाताच आनंदने दारू प्यायली. त्यावरून दोघा भाऊ-बहिणींमध्ये वाद झाला. या वादात आनंदने दारूच्या नशेत त्याच्या बहिणीसमोर खुनाची कुबुली दिली. हे ऐकल्यानंतर बहीणीच्या पायाखालची जमीन हादरली. मी आईची सुपारी देऊन तिची हत्या केली असल्याची माहिती आरोपी आनंदने दिली.

इतर बातम्या - हाय अलर्ट, समुद्रामार्गे भारतात घुसण्याच्या तयारीत पाकिस्तानी 'कमांडो'

बहिणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी आनंदला केली अटक

आरोपी आनंदची बहीण समजूतदार होती. तिने आरोपी भावाची पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यावेळी तिने पोलिसांना मोबाईलमधील फोटोही दाखवले. आईच्या हत्येमागे पोलिसांनी आऩंद, त्याचा मित्र आणि वहिणीला दोषी ठरवलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांनाही ताब्यात घेतलं आहे.

'काट डालूंगा...' नगरसेवकाचा टिक टॉक VIDEO VIRAL

Published by: Renuka Dhaybar
First published: August 29, 2019, 2:52 PM IST

ताज्या बातम्या