'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन

'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन

WWE सुपरस्टार 'द ग्रेट खली' म्हणजेच दलीप सिंहच्या आई टांडी देवी (Tandi Devi) यांचे निधन (Khali Dalip Singh mother passes away) झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जून: WWE सुपरस्टार 'द ग्रेट खली' म्हणजेच दलीप सिंहच्या आई टांडी देवी (Tandi Devi) यांचे निधन (Khali Dalip Singh mother passes away) झाले आहे. त्या 79 वर्षांच्या होत्या. टांडी देवी बऱ्याच काळापासून आजारी होत्या.  लुधियानामधील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. या उपचाराच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. खलीनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. टांडी देवींवर हिमाचल  प्रदेशातील गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टांडी देवी यांच्यावर लुधियानातील दयानंद मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. रविवारी रात्री त्यांचे निधन झाले. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

महिलेनं केली पतीची हत्या, गुन्ह्यानंतर Google वर सर्च केलेली हिस्ट्री पाहून पोलिसही हैराण

खली सध्या पंजाबमधील जालंधर जवळ रेसलिंग अकादमी चालवत आहे. यामध्ये देशभरातील कुस्तीपटूंना WWE चे प्रशिक्षण दिले जाते. 2006 पासून त्याने WWE खेळण्यास सुरुवात केली. त्याने 2007 साली वर्ल्ड हेविवेट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो एकमेव भारतीय आहे. त्याचबरोबर त्याने 2007 साली रॉयल रम्बल स्पर्धा देखील जिंकली आहे.

Published by: News18 Desk
First published: June 21, 2021, 9:43 AM IST
Tags: Punjab

ताज्या बातम्या