बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. आतापर्यंत स्पष्ट कल नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली NDA ला मिळालेला दिसतो. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीच्या आधारावर भाजप आणि जदयू यांच्या NDA ला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार असं भाजप नेतेही सांगू लागले आहेत. पण निवडणूक आयोगाने आत्ताच दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत फक्त 25 टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे. अजूनही 4 कोटी मतांची मोजणी बाकी आहे. त्यामुळे निकाल फिरण्याचीही शक्यता आहे. निकाल फिरू शकतो 2 कारणांमुळे दुपारी 1 वाजेपर्यंत NDA ला 128 जागांवर आघाडी मिळालेली होती, तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधनला 100 च्या आसपास जागांवर आघाडी मिळवता आली. पण जवळपास 100 जागांवर दोन उमेदवारांच्या मतांमध्ये 2000 पेक्षाही कमी तफावत आहे. त्यामुळे निवडणूक निकालाचा कल कधीही फिरण्याची शक्यता आहे. दुसरं कारण अद्याप मतमोजणी अंतिम टप्प्यात आलेली नाही. निकाल पूर्ण व्हायला विलंब होऊ शकतो आणि पुढच्या टप्प्यांमध्ये कदाचित कल बदलूही शकतात.अमेरिका में अगर ईवीएम से चुनाव होता तो क्या ट्रम्प हार सकते थे ?
— Dr. Udit Raj (@Dr_Uditraj) November 10, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar Election