पाकिस्तानला बुरे दिन! ६ वर्षांत वाढत्या महागाईनं कंबरडं मोडलं

पाकिस्तानला बुरे दिन! ६ वर्षांत वाढत्या महागाईनं कंबरडं मोडलं

दिवसेंदिवस वाढत्या महागाईनं पाकिस्तानच्या जनतेचे खिसे रिकामे झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल: कंगाल पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. आंतरराष्ट्रीय दबाव, चहूबाजूंनी पाकिस्तानची कोंडी झाल्यानं पाकिस्तानला चांगलाच फटका बसला आहे. पाकिस्तानात दिवसेंदिवस महागाईचे उच्चांक गाठले आहेत. वाढत्या महागाईचे चटके मात्र पाकिस्तानातील जनतेच्या खिशाला बसत आहेत.

पाकिस्तानातील जनता पेट्रोल आणि भाजी-पाल्याचे दर वाढल्यानं आधीच त्रस्त आहे. आता त्यात भर पडली आहे दूध दरवाढीची. दुधानं तर थेट शंभरी गाठली आहे.

कराची डेरी फार्मसी असोसिएशनने दुधाच्या दरात लिटरमागे 23 रुपयांची वाढ केली आहे. दुधाचे भाव डेअरीत 120 तर बाजारात 180 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वारंवार दुधाचे दर वाढवण्याची मागणी करूनही पाकिस्तान सरकारनं दुर्लक्ष केल्यानं ही दरवाढ करावी लागत असल्याचं कराची डेरी फार्मसी असोसिएशनचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे इतक्या महाग दरात दूध विकणाऱ्या असोसिएशन, दुकानदारांवर कारवाई केली जात आहे असं पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा- दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावणार, दिग्गजांच्या मतदारसंघांचा समावेश

मार्च 2019 मध्ये पाकिस्तानमधील महागाईचा दर 9.41 टक्के होता. वारंवार वाढणाऱ्या महागाईमुळे पाकिस्तानमधील बँकांनी व्याजदरही 10.75 टक्के केला आहे. तर काही कंपन्यांनी त्यांचं बस्तान हलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर आर्थिक संकट आलं आहे.पाकिस्तान दहशतवादाल थारा देत असल्यानं भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांनी पाकिस्तानची निर्यात बंद केली होती. भारतावर करण्यात आलेल्या भ्याड पुलवामा हल्ल्यानंतर भारतानंही पाणी अडवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत आश्वासन दिलं होतं. मात्र गेल्या ६ सातत्यानं पाकिस्तानातील वाढत्या महागाईवर इम्रान खान काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या काही महिन्यात दिवाळखोर राष्ट्र म्हणून पाकिस्तानकडे पाहिलं जातं का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. पाकिस्तानातील वाढत्या महागाईमुळे जनतेचे बुरे दिन सुरू झाले आहेत.

SPECIAL REPORT : उर्मिलांच्या प्रचारात 'मोदी-मोदी' घोषणा देऊन कुणी घातला राडा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 08:24 AM IST

ताज्या बातम्या