खरं की खोटं; पाकिस्तानी पायलट घेत आहेत 'राफेल' चालवण्याचं ट्रेनिंग

खरं की खोटं; पाकिस्तानी पायलट घेत आहेत 'राफेल' चालवण्याचं ट्रेनिंग

पाकिस्तान कतारच्या हवाई दलाकडून अशा प्रकारचं प्रशिक्षण घेत असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 11 एप्रिल : 'राफेल' या लढाऊ विमानांच्या खरेदीवरून भारतात राजकीय वादळ निर्माण झालेलं असतानाच एका नव्या बातमीने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी हवाई दलाचे पायलट्स राफेल चालविण्याचं प्रशिक्षण घेत असल्याची माहिती उघड झालीय. मात्र यानंतर उलट सुटल माहिती प्रसिद्ध झाल्याने त्या गोंधळात भर पडली. पण खरी माहिती आता पुढे आलीय.

पाकिस्तान कतारच्या हवाई दलाकडून अशा प्रकारचं प्रशिक्षण घेत असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. पाकिस्तान आणि कतार यांच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार हे प्रशिक्षण देण्यात असल्याचं त्यात म्हटलं होतं. तर राफेल तयार करणाऱ्या फ्रान्सच्या दाँसा या कंपनीनं हे वृत्त फेटाळून लावलंय. अशा प्रकारचं कुठलंही ट्रेनिंग दाँसा देत नाही असा दावा कंपनीने केलाय.

तर भारतातले फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर जिगलर यांनीही अशा प्रकारचं वृत्त हे खोटी बातमी असल्याचं म्हटलं आहे. जिगलर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. कतारने 2015मध्ये दाँसा कंपनीसोबत 24 राफेल विमानांसाठी करार केला होता. तर 2017मध्ये 12 विमानांची ऑर्डर दिली होती. त्यानंतर 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात कतारला पहिलं विमान मिळालं होतं.

पाकिस्तानने मध्यपूर्वेतल्या अनेक देशांसोबत लष्करी सहकार्याचा करार केला आहे. त्यातूनच जॉर्डनने पाकिस्तानला F-16 A/B हे विमान दिलं होतं. त्याचाच वापर पाकिस्तानने भारतावरच्या हवाई हल्ल्यात केला होता असंही म्हटलं जात आहे.

केव्हा येणार राफेल भारतात

राफेल विमान करारावरून गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात मोठा गदारोळ सुरू आहे. अशातच आता राफेल विमान भारतात नक्की कधीपर्यंत येऊ शकेल, याबाबत भारताच्या हवाई दलाचे प्रमुख बिरेंदर सिंह धानोआ यांनी माहिती दिली आहे.

'राफेल ही लढाऊ विमानं साधारणपणे याच वर्षी सप्टेंबरपर्यंत दाखल होतील,' असं बिरेंदर सिंह धानोआ यांनी काही वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. त्यामुळे मोठ्या वादानंतर राफेल विमानं भारतात दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

First published: April 11, 2019, 5:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading