वाराणसी, 09 जून : जगभरात प्रसिद्ध असलेल्या काशीच्या शिवानंद बाबांना (Shivanand baba) बुधवारी कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) देण्यात आली. शिवानंद बाबा जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती मानले जातात. आधार कार्ड आणि पासपोर्टनुसार त्यांचं वय 125 वर्षे आहे. शिवानंद बाबांनी दुर्गाकुंड स्थित यूपीएचसी येथे कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.
भेलूपूर भागातील कबीरनगर कॉलनी येथील स्वामी शिवानंद आश्रमात राहणारे बाबा शिवानंद या वयातही खूपच सक्रिय आहेत. ते रोज पहाटे तीन वाजता उठतात भरपूर वेग योग करतात. त्यानंतर ते आपला रोजचा नित्यक्रम सुरू करतात. शिवानंद बाबा नेहमी साधं अन्न खातात आणि तेल-मसाल्यांचा वापर केलेले भोजन ते कधी घेत नाहीत. त्यांनी लग्न केलेले नाही. विशेष म्हणजे या वयातही त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार झालेला नाही.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे प्रेरणास्थान
अभिनेत्री शिल्पा शेट्टीची तिच्या फिटनेस, आरोग्य आणि योगावरून एक वेगळी ओळख आहे. शिल्पा शेट्टी आपल्या आरोग्यासाठी, जीवनशैलीसाठी, सकारात्मक जीवनासाठी प्रेरणा म्हणून शिवानंद बाबा यांना मानते. शिल्पा शेट्टीने ट्विटरवर बाबांचा व्हिडिओ शेअर करताना याबाबत माहिती दिली आहे.
(1/4)
Had to post this... Such a happy and positive soul Sivanand Baba is, he’s 123 years old. The idol we all need in our lives for wellness, sharing the best mantra for a happy life so beautifully...#ShilpaKaMantra #SwasthRahoMastRaho #yogi #oldestmanalive pic.twitter.com/v2EcFdDL8R — SHILPA SHETTY KUNDRA (@TheShilpaShetty) July 14, 2020
श्रीहट्ट, बांगलादेशात जन्म
शिवानंद बाबांना जेवणात दूध आणि फळे आवडत नाहीत, ते फक्त उकडलेले अन्न खातात. ते कधी पूर्ण पोटभर जेवत नाहीत अर्धे पोटी जेवण बंद करतात. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1896 रोजी बांगलादेशच्या श्रीहट्ट जिल्ह्यात झाला होता. त्यांचे आईवडील खूप गरीब होते आणि भीक मागून आपले जीवन जगत असत. एक दिवस त्यांचे आई-वडील उपासमारीमुळं मरण पावले होते, तेव्हापासून बाबांनी फक्त अर्धे पोट जेवण खाण्याची शपथ घेतली. त्यांनी आश्रमात दीक्षा घेतली आणि त्यानंतर 1977 मध्ये वृंदावन येथे गेले. दोन वर्षे वृंदावनमध्ये राहिल्यानंतर बाबा 1979 मध्ये काशीला आले. तेव्हापासून ते येथेच राहत आहेत. बाबांची दिनचर्या पाहून कुणालाही त्यांच्या वयावर विश्वास बसत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.