जगभरातील पासपोर्टच्या या 4 रंगांचा हा आहे अर्थ !

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 20, 2018 02:18 PM IST

जगभरातील पासपोर्टच्या या 4 रंगांचा हा आहे अर्थ !

मुंबई, 20 जून : प्रत्येक जण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या देशांमध्ये फिरण्यासाठी जात असतो. अशा वेळी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो पासपोर्ट. पण तुमच्या कधी लक्षात आलं का की, पासपोर्टचेही 4 रंग आहेत. आणि त्या रंगांमागे काही महत्त्वाची कारणं आहे.

लाल, निळा, हिरवा आणि काळा अशा 4 रंगांचे पासपोर्ट जगभरात वापरले जातात. जाणून घेऊयात त्यांच्या रंगांमागची गुपितं...

लाल रंगाचा पासपोर्ट

लाल रंग सर्वात सामान्य रंग मानला जातो. कुठल्याही देशाचा पासपोर्ट पहिला लाल रंगाचा बनवला जातो कारण तिथला इतिहास हा पूर्वी साम्यवादी होता. यात चीन, सर्बिया, रशिया, सोल्वेनिया, लात्विया, रुमानिया, पोलंड आणि जार्जिया या देशांचा समावेश आहे.

Loading...

याबरोबरच युरोपियन युनियनचे सदस्य देश देखील लाल रंगाचे पासपोर्ट वापरतात. अलिकडेच तुर्की, अल्बानिया आणि मखदुनियात देखील लाल रंगाचे पासपोर्ट जारी केले आहेत. त्याचबरोबर बोलिविया, कोलंबिया, अक्वाडोर आणि पेरूसारख्या देशांतील पासपोर्ट लाल रंगाचे आहेत.

निळ्या रंगाचा पासपोर्ट

असं म्हटलं जातं की, निळा रंग नव्या विश्वाचं प्रतीक आहे. सुत्रांच्या माहितीनुसार सुमारे 15 कॅरिबियन देशांमध्ये निळ्या रंगांचे पासपोर्ट आहेत. यात ब्राझील, अर्जेंटीना, पेरूग्वे या देशांचा समावेश आहे. त्यात व्हेनेझुएला अपवाद आहे, कारण या देशाचा पासपोर्ट लाल रंगाचा आहे.

अनेरिकेचा पासपोर्ट निळ्या रंगाचा आहे.

हिरव्या रंगाचा पासपोर्ट

मुस्लीम धर्मीयांमध्ये हिरव्या रंगाचा वापर जास्त केला जातो. त्यांचा असा विश्वास आहे की, पैगंबर मुहम्मद साहेब यांना हिरवा रंग खूप आवडायचा. त्यामुळे बहुतेक सगळ्यात मुस्लीम देशांचे पासपोर्ट हे हिरव्या रंगाचे आहेत.

यात मोरक्को, सौदी अरब आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. पश्चिम आफ्रिकी देश म्हणजे फासो, नायजेरिया, नायजर, आयवरी कोस्ट आणि सिनेगल या देशांचे पासपोर्टही हिरव्या रंगांचे आहेत.

काळ्या रंगाचा पासपोर्ट

संपूर्ण जगात फार कमी देश असे आहेत. ज्यांचा पासपोर्ट काळ्या रंगाचा आहे. आफ्रिकेतले काही देश म्हणजे जांबिया, बुरूण्डी, गॅबन, अंगोला, कांगो, मलावी या देशांचे पासपोर्ट काळ्या रंगांचे आहेत. तर न्यूझीलंड या देशाचा राष्ट्रीय रंग काळा आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2018 02:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...