कुरापती सुरूच! पाकिस्तानच्या F-16 विमानानं आकाशात रोखलं स्पाइसजेट विमान

कुरापती सुरूच! पाकिस्तानच्या F-16 विमानानं आकाशात रोखलं स्पाइसजेट विमान

पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचं काही नाव घेत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी देखील पाकिस्तानी एअर फोर्सचं लढाऊ विमान F-16नं नवी दिल्लीहून काबूलला जाणाऱ्या स्पाइसजेट विमानाचा मार्ग रोखल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : भारतानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईनंतर पाकिस्तान पूर्णतः बिथरलेला आहे. या कारवाईनंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. पण यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचं काही नाव घेत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी देखील पाकिस्तानी एअर फोर्सचं लढाऊ विमान F-16नं नवी दिल्लीहून काबूलला जाणाऱ्या स्पाइसजेट विमानाचा मार्ग रोखल्याची माहिती समोर आली आहे. 23 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार हा दावा करण्यात आला आहे. जर या घटनेत कोणत्याही प्रकारची चूक झाली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, असं म्हटलं जात आहे.

(वाचा : #GoBackModi : पाकिस्तानने रचला मोठा कट, न्यूज 18 ने केला खुलासा)

ANIच्या माहितीनुसार, हवेत असतानाच पाकिस्तानच्या दोन विमानांनी स्पाइस जेटच्या विमानाला घेराव घातला. एवढंच नाही तर विमानाच्या उड्डाणाची उंची कमी करा, असंही स्पाइस जेट व्यावसायिक विमानाच्या वैमानिकाला सूचना देण्यात आल्या. स्पाइसजेटच्या वैमानिकानं पाकिस्तानी एअर फोर्सच्या वैमानिकांबरोबर संवाद साधला आणि व्यावसायिक विमान असल्याची माहिती दिली. दरम्यान, पाकिस्तानी वैमानिकांची खात्री पटल्यानंतर स्पाइसजेटच्या विमानाला अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करेपर्यंत संरक्षण देण्यात आले.

(वाचा : बॉम्ब टाकला होता 1945मध्ये; स्फोट झाला 2019साली!)

विमानातील प्रवाशानं नाव न सांगण्याच्या अटीवरून माहिती दिल्याचा दावा ANI नं केला आहे. पाकिस्तानी विमानाच्या वैमानिकांनी सांकेतिक भाषेच्या माध्यमातून स्पाइस जेटच्या वैमानिकाला विमानाच्या उड्डाणाची उंची कमी करण्यास सांगितलं, अशी माहिती प्रवाशानं दिली.

(वाचा :लंडनच्या क्रीडा व्यवसाय परिषदेत गाजलं नीता अंबानींचं भाषण)

स्पाइसजेटच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर कॉल साइनवरून गोंधळ निर्माण झाल्याची माहिती डीजीसीएमधील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, स्पाइस जेटकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

VIDEO : हर्षवर्धन जाधव बावळट आणि मनोरुग्ण, चंद्रकांत खैरेंचा पलटवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 06:32 PM IST

ताज्या बातम्या