Googleवर 'भिकारी' सर्च केल्यानंतर दिसतोय पाक पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो

Googleवर 'भिकारी' सर्च केल्यानंतर दिसतोय पाक पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो

सर्च इंजिन गुगलवर 'भिकारी' हा शब्द सर्च केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan)यांचा फोटो दिसत आहे.

  • Share this:

 मुंबई, 18 ऑगस्ट : सर्च इंजिन गुगलवर 'भिकारी' हा शब्द सर्च केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan)यांचा फोटो दिसत आहे. गुगल दाखवत असलेल्या फोटोंमध्ये इमरान खान हातात वाडगं घेऊन भीक मागताना दिसत आहेत. पण हे फोटो खरे नसून एडिट केलेले आहेत. इमरान खान यांच्या फोटोसोबत छेडछाड करण्यात आली असून यामध्ये त्यांना रस्त्यावर भीक मागताना दाखवलं गेलंय.

पाकिस्तान सध्या भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. हीच परिस्थिती दाखवण्यासाठी इमरान खान यांच्या फोटोसोबत छेडछाड करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय, आर्थिक संकटातून देशाला बाहेर पडण्यासाठी इमरान खान जगातील कित्येक देशांकडून कर्ज घेण्यासाठी दौरेदेखील करत आहेत.

(वाचा :भारतीय नारी पाक नागरिकांवर भारी,तिरंग्याचा अपमान करणाऱ्यांना महिला पत्रकार भिडली)

View image on Twitter

सोशल मीडियावर फोटो व्हायरल   

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवरून नेटिझन्सकडून पाकिस्तान आणि इमरान खान यांची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातील सरकारी वृत्तवाहिनी पीटीव्हीनं 'बेगिंग' विवादावर जाहीर माफी मागितली. इमरान खान यांच्या लाइव्ह (Live) भाषण प्रसारणादरम्यान वृत्तवाहिनीनं बीजिंग (चीनची राजधानी)ऐवजी 'बेगिंग' (भीक मागणे) असं लिहिलं होते.

View image on Twitter

(वाचा : धक्कादायक! लग्नसोहळ्यात आत्मघाती बॉम्बस्फोट, 63 जणांचा जागीच मृत्यू)

ही चूक वृत्तवाहिनीवर जवळपास 20 सेकंदांपर्यंत दिसत होती. यावरूनही प्रचंड चर्चा झाली. यानंतर आता इमरान खान यांच्या भिकारी अवतारातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

(वाचा :वासनांध बापानं 2 वर्षे मुलीवर केला बलात्कार, विरोध केल्यानंतर शरीराचे केले तुकडे)

VIDEO: पाणीपुरीत सापडल्या जिवंत अळ्या, पोलखोल होताच विक्रेता फरार!

Published by: Akshay Shitole
First published: August 18, 2019, 2:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading