BREAKING : ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजाचा मृत्यू - अमेरिकन मीडिया

BREAKING : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 08:38 AM IST

BREAKING : ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजाचा मृत्यू - अमेरिकन मीडिया

वॉशिंग्टन, 1 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हमजा बिन लादेनचा मृत्यू नेमका कुठे झाला, कोणत्या तारखेला झाला याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात अमेरिकन सरकारनं हमजाच्या ठावठिकाणा सांगणाऱ्याला 1 दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं होतं. अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,  गेल्या काही दिवसांपूर्वी 30 वर्षीय हमजा बिन लादेनं अमेरिका आणि अन्य देशांवर हल्ला करण्यासंदर्भातील एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता.

(पाहा :'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक सिद्धार्थ यांनी का उचलले टोकाचे पाऊल?)

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं भाष्य नाही

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बुधवारी पत्रकारांनी यासंदर्भात प्रश्न विचारले असता यावर प्रतिक्रिया देणे त्यांनी टाळलं. 'मला यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही', असे ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिका हमजा बिन लादेनच्या शोधात होती. अखेर आज त्याच्या मृत्युची बातमी समोर आली आहे.

(पाहा :दोस्ती आहे ना भाऊ! उंदीर आणि मांजराचा मस्तीचा VIDEO व्हायरल)

Loading...

इराणमध्ये नजरकैदेत होता हमजा?

इराणमध्ये हमजाला नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती आहे. पण दुसरीकडे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि सीरियामध्येही त्यानं वास्तव्य केल्याचं म्हटलं जातं. अमेरिकन प्रशासननं सांगितलं की, 2011 मध्ये पाकिस्तानच्या एबटाबाद येथील त्याच्या वडिलांच्या घरावर छापेमारीदरम्यान जप्त केलेल्या दस्तऐवजांद्वारे हमजा बिन लादेन अल-कायदा ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना चालवत असल्याची माहिती समोर आली होती.

SPECIAL REPORT: भाजपच्या तोडाफोडीला उत्तर देण्यासाठी काँग्रेसची नवा प्लान, थोरात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 08:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...