Home /News /national /

World Largest Tricolor: 1400 किलो वजनाचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज, 225 फूट लांब, 125 फूट रुंद

World Largest Tricolor: 1400 किलो वजनाचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज, 225 फूट लांब, 125 फूट रुंद

World Largest Tricolor

World Largest Tricolor

15 जानेवारीला देशभरात भारतीय सेना दिवस (Army Day) साजरा करण्यात आला. याच दिवसाचे औचित्य साधत जगातील सर्वात मोठ्या तिरंग्याची(World Largest Tricolor) निर्मिती करण्यात आली.

    नवी दिल्ली, 16 जानेवारी: 15 जानेवारीला देशभरात भारतीय सेना दिवस (Army Day) साजरा करण्यात आला. याच दिवसाचे औचित्य साधत जगातील सर्वात मोठ्या तिरंग्याची (World Largest Tricolor) निर्मिती करण्यात आली. राजस्थान येथे जैसलमेरमध्ये 225 फूट लांब, 125 फूट रुंद आणि वजन 1400 किलोचा तिरंगा आहे. तो बनवण्यासाठी 49 दिवस लागले. तिरंगा खादीचा असून हाताने बनवलेला आहे. हा ध्वज खादी ग्रामोद्योगने बनवला आहे. बॅटल एक्स डिव्हिजनचे जीओसी मेजर जनरल योगेंद्र सिंग यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे ध्वजाचे अनावरण केले.  70 खादी कारागिरांनी 49 दिवस सलग मेहनत घेत या ध्वजाची निर्मिती केली आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर हा तिरंगा फडकवण्यात आला. हा ध्वज 1971 सालातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक युद्धाचे मुख्य केंद्र असलेल्या लोंगेवाला येथे प्रदर्शित केला जाईल. या ध्वजाची निर्मितीसाठी खादी कारागीर 3500 तास काम करत होते. हा ध्वज बनवताना हाताने कातलेले आणि हाताने विणलेल्या खादीच्या सुती ध्वजपटचा वापर करण्यात आला आहे. त्याचे क्षेत्रफळ 33,750 चौरस फूट आहे. या ध्वजातील अशोक चक्राचा व्यास 30 फूट रुंद आहे. सर्वप्रथम 2 ऑक्टोबर 2021 रोजी खादीचा तिरंगा फडकवण्यात आला. लेहमध्ये या तिरंग्याचे अनावरण करण्यात आले. खादीचा पाचवा तिरंगा यापूर्वी, चार ठिकाणी खादीचा तिरंगा फडकवण्यात आला आहे. 2 ऑक्टोबरनंतर 8 ऑक्टोबर 2021 रोजी हवाई दल दिनानिमित्त हिंडन एअरबेसवर खादीचा तिरंगा फडकवण्यात आला. यानंतर 21 ऑक्टोबर 2021 रोजी लाल किल्ल्यावर खादीचा तिरंगा फडकवण्यात आला. कारण त्याच दिवशी भारतात 100 कोटी लसीकरण डोसचा आकडा पूर्ण झाला. त्यानंतर 4 डिसेंबर 2021 रोजी नौदल दिनानिमित्त मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील नेव्हल डॉकयार्डवर खादीचा तिरंगा फडकवण्यात आला.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Army, Indian army

    पुढील बातम्या