अखेर पाकिस्तान झुकलं ! 24 तासांत कुलभूषण जाधवांना मिळाला 'हा' अधिकार

अखेर पाकिस्तान झुकलं ! 24 तासांत कुलभूषण जाधवांना मिळाला 'हा' अधिकार

आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर अखेर पाकिस्तान झुकलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पाकिस्तानकडून 24 तासांतमध्ये जाधव यांना महत्त्वपूर्ण अधिकार देण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जुलै : आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर अखेर पाकिस्तान झुकलं आहे. पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिली. 17 जुलै रोजी न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निर्णय देत पाकिस्तानला दणका दिला. या निर्णयानंतर आता जाधव यांना काउन्सिलर अॅक्सेस (councillor access) देण्यात येणार आहे. याद्वारे त्यांना राजनैतिक संपर्काचा अधिकार देण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, 'ICJच्या निर्णयाचं पालन करत 'व्हिएन्ना' करार अंतर्गत जाधव यांच्या Councillor Access वर त्यांच्या अधिकारांची माहिती देण्यात आली. पाकिस्तानी कायद्यानुसार त्यांना Councillor Access दिला जाईल, यासाठीच्या कार्यप्रणालीवर कामदेखील सुरू करण्यात आलं आहे'. या निर्णयामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडघशी पडलं आहे. दरम्यान, पाकिस्ताननं जाधव यांना यापूर्वी तब्बल 16 वेळा राजनैतिक संपर्काचा अधिकार देण्यास नकार दिला होता.

(पाहा:SPECIAL REPORT: युतीच्या वाटेवर कोण? आघाडीसाठी धोक्याची घंटा)

फाशीच्या शिक्षेला स्थगिती, भारताचा विजय

दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून आलेला निर्णय म्हणजे स्पष्ट स्वरुपात भारताचा विजय आहे. बुधवारी (17 जुलै)न्यायालयाच्या 16 पैकी 15 न्यायमूर्तींनी भारताची बाजू योग्य ठरवली. जाधव यांना अटक करताना आणि त्यांच्याविरुद्ध खटला चालवताना पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले, हे भारताने ठोस पुराव्यांसह सिद्ध करून दाखवले.

(पाहा :SPECIAL REPORT: 'या' क्वाड्रासायकलमधून तुम्ही प्रवास केलात का?)

व्हिएन्ना कराराचं उल्लंघन

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 ला बलुचिस्तानमध्ये ताब्यात घेतलं, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानने त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.भारताने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली.

(पाहा :SPECIAL REPORT: अग्निशमन दलात 2 कोटींचा रोबो दाखल;आग विझवण्यासाठी करणार अशी मदत!)

काय आहे हे प्रकरण?

25 मार्च 2016 : कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली.

10 एप्रिल 2017 : पाकिस्तान लष्कराच्या कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली.

8 मे 2017 : भारताने याबद्दल आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली.

15 मे 2017 : या खटल्याची सुनावणी झाली.

18 मई 2017: आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.

25 डिसेंबर 2017: कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने त्यांची भेट घेतली.

28 डिसेंबर 2017: परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या भेटीबदद्ल संसदेत माहिती दिली.

दारूची अवैध वाहतूक करणारे 7 जण ताब्यात, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: July 19, 2019, 9:41 AM IST

ताज्या बातम्या