मराठी बातम्या /बातम्या /देश /

World Inequality Lab Report : भारत सर्वांत जास्त असमानता असलेल्या देशांच्या यादीत; एक टक्का नागरिकांकडे 22 टक्के राष्ट्रीय उत्पन्न

World Inequality Lab Report : भारत सर्वांत जास्त असमानता असलेल्या देशांच्या यादीत; एक टक्का नागरिकांकडे 22 टक्के राष्ट्रीय उत्पन्न

फ्रान्समधले अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेट्टी (Thomas Piketty) यांच्यासह अनेक तज्ज्ञांच्या सहयोगाने हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्या अहवालात असं सांगण्यात आलं आहे, की भारताचा (India) समावेश जगातल्या सर्वांत जास्त असमानता असलेल्या देशांच्या यादीत झाला आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 8 डिसेंबर : गरीब आणि सर्वांत जास्त असमानता असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. 2021च्या आकडेवारीनुसार, भारतातल्या एक टक्का लोकसंख्येकडे राष्ट्रीय उत्पन्नातला 22 टक्के वाटा आहे. त्यातला केवळ 13 टक्के हिस्सा तळागाळातल्या 50 टक्के समाजाकडे आहे. जागतिक असमानता अहवाल 2022 अर्थात World Inequality Report 2022 प्रसिद्ध झाला असून, त्यात हे निरीक्षण मांडण्यात आलं आहे. वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅबचे (World Inequality Lab) सहसंचालक लुकास चान्सल (Lucas Chancel) यांनी हा अहवाल तयार केला आहे.

फ्रान्समधले अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेट्टी (Thomas Piketty) यांच्यासह अनेक तज्ज्ञांच्या सहयोगाने हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्या अहवालात असं सांगण्यात आलं आहे, की भारताचा (India) समावेश जगातल्या सर्वांत जास्त असमानता असलेल्या देशांच्या यादीत झाला आहे. भारतातल्या प्रौढ लोकसंख्येचं सरासरी वार्षिक राष्ट्रीय उत्पन्न 2,04,200 रुपये आहे. तळागळातल्या म्हणजेच जवळपास 50 टक्के लोकसंख्येचं सरासरी उत्पन्न 53,610 रुपये आहे. समाजातल्या सर्वांत वरच्या 10 टक्के लोकसंख्येचं उत्पन्न यापेक्षा सुमारे 20 पट जास्त म्हणजेच 11,66,520 रुपये एवढं आहे, असं या अहवालात म्हटलं आहे.

राष्ट्रीय उत्पन्नातला 57 टक्के भाग भारतातल्या सर्वांत वरच्या 10 टक्के लोकसंख्येकडे म्हणजेच श्रीमंतांकडे एकवटला आहे. सर्वांत वरच्या एक टक्का लोकसंख्येच्या म्हणजेच अतिश्रीमंतांच्या हातात राष्ट्रीय उत्पन्नातला 22 टक्के भाग आहे. सर्वांत खालच्या 50 टक्के लोकसंख्येकडे मात्र राष्ट्रीय उत्पन्नातला केवळ 13 टक्के हिस्सा आहे. भारतात सरासरी कौटुंबिक उत्पन्न 9,83,010 रुपये एवढं आहे. या अहवालात म्हटलं आहे, की भारत हा एक गरीब आणि खूप असमानता असलेला देश आहे. या देशात उच्चभ्रू लोकसंख्या मोठी आहे.

भारतात लैंगिक असमानताही (Gender Inequality) खूप असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. एकूण उत्पन्नात महिला कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाचा वाटा 18 टक्के आहे. चीन वगळता आशियाची या बाबतीतली सरासरी 21 टक्के आहे.

जागतिक पातळीचा विचार करायचा झाल्यास, जगातल्या सर्वांत श्रीमंत असलेल्या 10 टक्के लोकसंख्येकडे जागतिक संपत्तीतला 76 टक्के हिस्सा आहे. जगातल्या निम्म्या म्हणजेच गरीब लोकसंख्येकडे मात्र केवळ 2 टक्के संपत्ती आहे. युरोपात अशी असमानता सर्वांत कमी आहे, असं या अहवालात म्हटलं आहे.

First published:

Tags: Economy, India