जागतिक पर्यावरण दिन : आपल्याच सवयींमुळे दरवर्षी जातोय 1 लाख मुलांचा बळी

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या एका अहवालामध्ये हवेचं प्रदूषण हा राष्ट्रीय पातळीवरच्या आणीबाणीचा विषय झाला आहे, असं नमूद करण्यात आलं आहे. भारतात हवेच्या प्रदूषणामुळे दरवर्षी पाच वर्षांखालच्या एक लाख मुलांचा जीव जातो आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 05:51 PM IST

जागतिक पर्यावरण दिन : आपल्याच सवयींमुळे दरवर्षी जातोय 1 लाख मुलांचा बळी

नवी दिल्ली, 5 जून : हवेचं प्रदूषण ही समस्या जगभरातच गंभीर बनली आहे. 2017 च्या एका आकडेवारीनुासर हवेच्या प्रदूषणामुळे भारतात 12 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या एका अहवालामध्ये हवेचं प्रदूषण हा राष्ट्रीय पातळीवरच्या आणीबाणीचा विषय झाला आहे, असं नमूद करण्यात आलं आहे. भारतात हवेच्या प्रदूषणामुळे दरवर्षी पाच वर्षांखालच्या एक लाख मुलांचा जीव जातो आहे.

लहान मुलींवर परिणाम

पर्यावरणाच्या विषयावर थिंक टँक म्हणून काम करणाऱ्या सीएसई च्या अहवालानुसार, हवेच्या प्रदूषणामुळे बळी गेलेल्यांमध्ये लहान मुलींचं प्रमाण जास्त आहे.

भारतात होणाऱ्या मृत्यूंपैकी 12. 5 टक्के मृत्यू हे हवेच्या प्रदूषणामुळे होतात. लहान मुलांवर होणारा वायू प्रदूषणाचा परिणाम अजूनच गंभीर आहे.

Loading...

प्रदूषणावर सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत पण या योजनांना अजून यश आलेलं नाही. पर्यावरण मंत्रालयानेही हे मान्य केलं आहे.

दिल्ली ही जगातली प्रदूषित राजधानी

ग्रीनपीस या जागतिक पातळीवर काम करणाऱ्या पर्यावरण संस्थ्येच्या अहवालानुसार दिल्ली ही जगातली सगळ्यात प्रदूषित राजधानी आहे. भारताने 2013 मध्ये एक संकल्प केला आहे. 2020 पर्यंत रस्त्यावर इलेक्ट्रिक वाहनं येतील, असा हा संकल्प आहे. यासाठी दीड कोटी हायब्रिड वाहनांच्या विक्रीचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.

इलेक्ट्रिक कार कधी येणार?

असं असलं तरी इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत अपेक्षित लक्ष्य गाठणं भारताला शक्य झालेलं नाही, असं सीएसई संस्थेचा अहवाल सांगतो. या अहवालात पाणी पुरवठा, आरोग्य, कचऱ्याची विल्हेवाट, वन्यजीव व्यवस्थापन या क्षेत्रातल्या भारताच्या कामगिरीचाही आढावा घेण्यात आला आहे.

==============================================================================================

VIDEO: मै लिखूँगी क्योंकि... IAS अधिकारी निधी चौधरींनी मांडली व्यथा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 05:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...