भारताला वर्ल्ड बँकेचा दणका, सलग दुसऱ्या वर्षी विकास दर घसरला

भारताला वर्ल्ड बँकेचा दणका, सलग दुसऱ्या वर्षी विकास दर घसरला

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर आता वर्ल्ड बँकेनंही भारताचा जीडीपी कमी केला आहे. देशातील शेती विकास दर 2.9 टक्क्यांवर पोहचला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर आता जागतिक बँकेनंही भारताचा जीडीपी कमी केला आहे. जागतिक बँकेनं आर्थिक वर्ष 2019-20 च्या जीडीपीचा अंदाज 0.9 टक्क्यांनी कमी करून 6 टक्के केला आहे. गेल्या वर्षी भारताचा विकास दर 6.9 टक्के इतका होता. जागतिक बँकेच्या अहवालानुसार आर्थिक वर्षांत भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढेल आणि 2021 पर्यंत पुन्हा 6.7 टक्क्यांपर्यंत पोहचेल असं म्हटलं आहे. याशिवाय 2022 पर्यंत विकासदर 7.2 टक्क्यांवर जाईल असंही जागितक बँकेनं म्हटलं आहे.

चालू आर्थिक वर्षांत भारताच्या जीडीपीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देखील कपात केली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने विकास दराचा अंदाज 0.30 टक्क्यांनी कमी करून तो 7 टक्के इतका सांगितला होता. त्याआधी रिझर्व्ह बँकेनंही जीडीपी 6.8 टक्क्यांवरून 6.1 टक्के केला होता.

जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांची वार्षिक बैठक लवकरच होणार आहे. त्याआधी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये भारताच्या विकासदरात सलग दुसऱ्या वर्षी घसरण झाली आहे. 2017-18 मध्ये विकास दर 7.2 टक्के होता. तो 2018-19 मध्ये 6.8 टक्क्यांवर आला होता. यावर्षी तो 6 टक्क्यांवर आला आहे.

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात औद्योगिक उत्पादन विकासात वाढ झाली आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि बांधकाम व्यवसायातील तेजीमुळे औद्योगिक विकास दर 6.9 टक्क्यांवर पोहचला आहे. तर शेती विकास दर 2.9 टक्के आणि सेवा क्षेत्रातील विकास दर 7.5 टक्के आहे.

जानेवारी ते मार्च या काळात देशाचा GDP म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्न दर घटला असून तो 5.8 टक्क्यांवर आला आहे. हा जीडीपी गेल्या काही महिन्यांतला सगळ्यात कमी आणि चीनच्याही खाली आहे.

उत्पादनात घट

शेतीक्षेत्र आणि उत्पादन क्षेत्रातली कामगिरी खालावल्यामुळे विकासदरात घट झाली आहे, असं सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिसचं म्हणणं आहे.

मागच्या आर्थिक वर्षात जीडीपीचा दर 7.2 टक्के होता. हा दर खालावून 2018-19 मध्ये 6.8 वर आला आहे.

2014-2015 या आर्थिक वर्षानंतर GDP म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर इतका खाली आहे. 2013-14 या वर्षांत एकदा हा दर 6.4 इतका होता.

मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांसोबत मॉर्निंग वॉक, पाहा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: October 13, 2019, 1:06 PM IST
Tags: GDPimf

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading