टिंडर अ‍ॅपद्वारे डेटवर गेलेल्या तरुणीची हत्या, शरीराचे केले 14 तुकडे

तुम्हाला जर Tinder डेटिंग अ‍ॅप वापरण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. नाही तर तुमचाही जीव जाण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2019 09:24 PM IST

टिंडर अ‍ॅपद्वारे डेटवर गेलेल्या तरुणीची हत्या, शरीराचे केले 14 तुकडे

वॉशिंग्टन, 9 जुलै : तुम्हाला जर डेटिंग अ‍ॅप वापरण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. नाही तर तुमचाही जीव जाण्याची शक्यता आहे. ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप वापरणाऱ्या एका युवतीच्या शरीराचे तब्बल 14 तुकडे करून हत्या करण्यात आली आहे. ही तरुणी टिंडर डेटिंग अ‍ॅप वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. ऑनलाइन डेटिंगदरम्यानच तिची निर्घृण हत्या केली गेली. अमेरिकेतील नेब्रास्का येथील ही धक्कादायक घटना आहे. याप्रकरणी आरोपीनं कोर्टात संतापजनक आणि विचित्र जबाब दिला आहे. आरोपीनं म्हटलं की, युवतीच्या सहमतीनं रफ सेक्सदरम्यान झालेल्या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला.

(पाहा :VIDEO: फेसबुक प्रेम पडलं महागात; ग्रामस्थांनी दहशतवादी समजून दिला चोप)

नेमकी काय आहे घटना?

डिसेंबर 2017मध्ये 24 वर्षीय सिडनी लूफे या युवतीचा मृतदेह छिन्हविछिन्ह अवस्थेत मिळाला होता. टिंडर अ‍ॅपद्वारे डेटला गेल्यानंतर जवळपास महिन्याभरानंतर लूफेच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी 52 वर्षीय औब्रे ट्रेल आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली होती. सोमवारी ट्रायल कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान लूफे हत्या प्रकरणासंबंधी अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी समोर आल्या. यानुसार दोषी सिद्ध झाल्यास ट्रेलला फाशीची शिक्षा मिळण्याची शक्यता आहे.

(पाहा :VIDEO: पत्त्यांसारखी कोसळली भिंत, घटना CCTVमध्ये कैद)

Loading...

'रफ सेक्सदरम्यान घडली दुर्घटना'

आरोपीच्या वकिलानं कोर्टात सांगितलं की, 'रफ सेक्सदरम्यान घडलेल्या दुर्घटनेदरम्यान लूफेचा मृत्यू झाला. तसंच लूफेच्या शरीरावर आढळलेल्या खुणादेखील सेक्सदरम्यानच झाल्या होत्या.'

(पाहा :'हम पाकिस्तानी हैं, पाकिस्तान हमारा हैं' काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांची नारेबाजी)

'Tinder द्वारे झाली फसवणूक' 

दुसरीकडे  सरकारी वकिलानं कोर्टात सांगितलं की, षड़यंत्र रचून लूफेला Tinder अ‍ॅपद्वारे फसवण्यात आलं आणि नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. डेटवर जाण्यापूर्वीच आरोपीची गर्लफ्रेंड सिडनी लूफेला भेटली होती, अशीही माहिती वकिलांनी कोर्टाला दिली.

VIDEO : राज ठाकरे-सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर काँग्रेस नेत्यांचा सूर बदलला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2019 09:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...