Home /News /national /

कसला हा उच्चांक..? World Air Quality Report मध्ये दिल्लीची हवा जगातील सर्वाधिक प्रदूषित, इस्लामाबादही आपल्यापेक्षा स्वच्छ

कसला हा उच्चांक..? World Air Quality Report मध्ये दिल्लीची हवा जगातील सर्वाधिक प्रदूषित, इस्लामाबादही आपल्यापेक्षा स्वच्छ

जागतिक वायू गुणवत्ता निर्देशांकामध्ये, भारतातील नवी दिल्ली सर्वात प्रदूषित (85.5) म्हणून गणली गेली आहे. तर, बांगलादेशातलं ढाका (78.1) दुसऱ्या क्रमांकावर, चाडचा (chad) एन'डायमेना तिसऱ्या क्रमांकावर (77.6) आहे. यामध्ये जगातील 6 हजार 475 शहरांचा डेटा समाविष्ट केला आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 22 मार्च : दिल्लीतील वायू प्रदूषणाची (Air Pollution) पातळी किती वाईट आहे, याचा जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2021 (World Air Quality Report 2021) प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात, संयुक्त राष्ट्र पर्यावरण संरक्षण संस्थेनं (UN Environment Protection Agency) जगभरातील हवेच्या गुणवत्तेचं रँकिंग जारी केलं आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचं म्हटलं आहे. अहवालातील डब्ल्यूएचओच्या हवेच्या गुणवत्ताविषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार (WHO air quality guideline), भारतातील कोणत्याही शहरानं त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता केलेली नाही. अहवालात शहरी पीएम 2.5 प्रदूषणापैकी 20 ते 35 टक्के प्रदूषण वाहनांमुळं झालेलं प्रदूषण म्हणून नोंदवलं गेलं आहे. हे वाचा - पेट्रोल डिझेल आणि दुधानंतर गॅस सिलेंडरही महागला, मोजावी लागणार इतकी किंमत जागतिक वायू गुणवत्ता निर्देशांकामध्ये, भारतातील नवी दिल्ली सर्वात प्रदूषित (85.5) म्हणून गणली गेली आहे. त्याचवेळी बांगलादेशातलं ढाका (78.1) दुसऱ्या क्रमांकावर, चाडचा (chad) एन'डायमेना तिसऱ्या क्रमांकावर (77.6) आहे. हे तिन्ही देश जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या श्रेणीत पहिल्या 3 मध्ये आहेत. यामध्ये जगातील 6 हजार 475 शहरांचा डेटा समाविष्ट करण्यात आला आहे. अहवालानुसार, जगातील प्रदूषित देशांच्या शहरांबद्दल बोलायचं तर, चौथ्या क्रमांकावर कझाकिस्तानचं दुशान्बे, पाचव्या क्रमांकावर ओमानचं मस्कत, सहाव्या क्रमांकावर नेपाळचं काठमांडू, सातव्या क्रमांकावर बहारीनचे मनामा, आठव्या क्रमांकावर इराकचं बगदाद, 9 व्या क्रमांकावर किरगिझस्तानचा बिश्केक, 10 वा क्रमांक उझबेकिस्तानच्या ताश्कंदचा आहे. तर, पाकिस्तानचं इस्लामाबाद (41.1) प्रदूषणाच्या बाबतीत 11 व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच, ते नवी दिल्लीपेक्षा स्वच्छ मानलं गेलं आहे. हे वाचा - हे आहेत Spider Man; लोकसभेत अरुणाचलचे खासदार नितीन गडकरींबद्दल का बोलले असं? राजधानीतील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी आणि ते अधिक स्वच्छ करण्यासाठी दिल्ली सरकारकडून अनेक मोठमोठ्या मोहिमा सातत्यानं राबविण्यात आल्या आहेत. असं असूनही, जागतिक वायू गुणवत्ता अहवालात जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून दिल्लीचा समावेश झाल्यामुळं या सर्व मोहिमा कुचकामी ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Air pollution, Delhi latest news

    पुढील बातम्या