अबब...माजी महापौरांच्या घरून 13 टन सोनं आणि 2.67 लाख कोटी जप्त

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपींग यांनी दुसऱ्यांदा कार्यभार स्वीकारल्यावर देशभरात मोहिम राबवून भ्रष्टाचारी नेत्यांना दणका दिला होता. चीनी कम्युनिष्ट पक्षाच्या अनेक नेत्यांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली होती.

News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2019 10:38 PM IST

अबब...माजी महापौरांच्या घरून 13 टन सोनं आणि 2.67 लाख कोटी जप्त

बिजिंग 02 ऑक्टोंबर : चिनी पोलिसांनी (Chinese Police) डॅन्झाउ इथल्या माजी महापौरांच्या घरावर छापा घातलाय. या छाप्यात जे पैसे मिळाले ते पाहून पोलीस थक्क झाले आहेत. चीनच्या विशेष दलाने भ्रष्टाचाराविरुद्ध विशेष मोहिम सुरू केलीय. या मोहिमेंतर्गत देशभर छापे घालण्यात येत आहेत. त्यासाठी विशेष दल स्थापन करण्यात आलंय. या दलाने अनेक आजी माजी नेत्यांच्या घरांवर छापे घालणं सुरू केलं असून त्यात मोठं घबाड सापडलंय. 13 टन सोनं आणि 2.67 लाख कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. आत्तापर्यंतच्या कारवाईत ही मोठी रक्कम असल्याचं म्हटलं जातंय.

पंतप्रधान मोदींचं भाषण दाखविण्यास नकार, दूरदर्शनचा अधिकारी निलंबित

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी((International Media) ) दिलेल्या माहितीनुसार  झांग क्वी असं त्या उपमहापौरांचं नाव आहे. त्यांच्या निवासस्थानी प्रचंड मोठं गुप्त तळघर होतं. त्या तळघरात ही रक्कम साठविण्यात आली होती. या सोन्याही आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत ही काही मिलियन अमेरिकी डॉलर होईल अशी शक्यता व्यक्त केलीय जातेय. यात डॉलर, यूरो आणि युआनही मिळाले आहेत. चीन सध्या आपल्या क्रांतीचा वर्धापन दिन साजरा करत असून लष्करी शक्तीचं प्रदर्शन त्यांनी केलं आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपींग यांनी दुसऱ्यांदा कार्यभार स्वीकारल्यावर देशभरात मोहिम राबवून भ्रष्टाचारी नेत्यांना दणका दिला होता. चीनी कम्युनिष्ट पक्षाच्या अनेक नेत्यांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईक अनेक नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं.

तिकीट न मिळाल्यामुळे भाजप नेत्याला अश्रू अनावर, भर सभेत ढसा-ढसा रडले

चीनमध्ये भ्रष्टाचार करणं हा मोठा गुन्हा आहे. भ्रष्टाचाऱ्यांना कडक शिक्षा दिली जाते. तरीही भ्रष्टाचाराविरुद्धच्या कारवाईत जे घाबड सपाडलं त्यावरून किती पैसै दडलेले आहेत हे कळतं. क्षी यांनी या मोहिमेचा उपयोग आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्यासाठीही केलाय. त्यात अनेक नेत्यांना तुरूंगात डांबण्यात आलं आलंय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2019 10:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...