Home /News /national /

Lockdown 17 मेनंतरही वाढू शकतो, पंतप्रधान आणि मुख्यंत्र्यांची 6 तास चालली मॅरेथॉन बैठक

Lockdown 17 मेनंतरही वाढू शकतो, पंतप्रधान आणि मुख्यंत्र्यांची 6 तास चालली मॅरेथॉन बैठक

मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरू करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांबरोबरच्या बैठकीत केली.

    नवी दिल्ली 11 मे: देशातला तीसरा लॉकडाऊन संपायला आता फक्त 6 दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. ही मॅरेथॉन चाललेली बैठक तब्बल 6 तास चालली. दुपारी 3 वाजता ही बैठक सुरू झाली होती. विभागवार राज्यांचे मुख्यमंत्री आपलं मत मांडत होती. अनेक मुख्यमंत्र्यांनी अर्थव्यवहार सुरू ठेवत लॉकडाऊन वाढविण्याची विनंती केली. त्यामुळे 17 मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याचीच शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी गर्दी झाली सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं गेलं नाही त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाले. कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका निर्माण झाल्याचं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. आता शहरातून लोक गावाकडे जात आहेत. त्यामुळे ती काळजीची परिस्थिती आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं. तर लॉकडाऊमध्ये ढिल देत अर्थव्यवस्था सुरू करण्यासाठी काय करता येईल याविषयी तुम्ही प्रस्ताव पाठवा अशी विनंतीही पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका पंतप्रधानांसमोर मांडली. 'मुंबईत राहिलो तर भुकेनं मरू'; रिक्षात संसार जमा करुन चालकांनी धरली गावाची वाट मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरू करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांबरोबरच्या बैठकीत केली. लॉकडाऊनच्याबाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, आम्ही सर्व राज्यं त्याप्रमाणे अंमलबजावणी करू असंही मुख्यंत्री म्हणाले. पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आज चर्चा केली. 17 मेनंतर काय याविषयी या वेळी चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची विनंती पंतप्रधानांना केली आहे. "लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करतांना आपण ग्रीन झोन्समध्ये उद्योग-व्यवसाय सुरु होतील असे पाहिले आहे. परप्रांतीय मजुरांची वाहतूक सुरू झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने हादरलं केंद्र सरकार, तयार होतोय नवा Action Plan मात्र हे करतांना प्रत्येक राज्याने व्यवस्थित काळजी आवश्यक आहे अन्यथा कोरोना संसर्ग देशभर वाढू शकतो", असंही मुख्यमंत्री म्हणाले. "महाराष्ट्राने 5.5 लाख मजुरांच्या निवारा व नाश्ता, भोजनाची व्यवस्था केली तसंच इतर राज्यांशी समन्वय ठेऊन मजुरांना पाठवणं सुरू केलं आहे", असं मुख्यमंत्री म्हणाले.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Narendra modi

    पुढील बातम्या