मराठी बातम्या /बातम्या /देश /

रिकाम्या पोटी धरली 1400 किमी दूर असलेल्या गावाकडची वाट, मजूराचा वाटेतच मृत्यू

रिकाम्या पोटी धरली 1400 किमी दूर असलेल्या गावाकडची वाट, मजूराचा वाटेतच मृत्यू

A group of Indian daily wage laborers walk along an expressway hoping to reach their homes, hundreds of kilometers away, as the city comes under lockdown in Ghaziabad, on the outskirts of New Delhi, India, Thursday, March 26, 2020. Some of India's legions of poor and people suddenly thrown out of work by a nationwide stay-at-home order began receiving aid distribution Thursday, as both the public and private sector work to blunt the impact of efforts to curb the coronavirus pandemic. Untold numbers of them are now out of work and many families have been left struggling to eat. (AP Photo/Altaf Qadri)

लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर मजुरांकडे कपड्यांशिवाय काहीच शिल्लक नव्हतं म्हणून त्यांनी गावी चालत जाण्याचा निर्णय घेतला.

  • Published by:  Suraj Yadav
मुंबई, 26 एप्रिल : मध्य प्रदेशात परराज्यातून येणाऱ्या मजुरांना आणण्यासाठी शिवराज सिंग चौहान यांनी 24 एप्रिलला घोषणा केली. त्याआधी मुंबईतून मध्य प्रदेशात जाण्यासाठी मोतीलाल साहू नावाचा कामगार चालत निघाला होता. घर गाठण्यासाठी त्याला 1400 किमी प्रवास करावा लागणार होता. काहीही न खाता पिता तो चालत निघाला होता. त्याचा वाटेतच मृत्यू झाला असून आता मृतदेह नेण्यासाठी कुटुंबियांनी 35 हजार रुपये एकत्र केले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, 38 वर्षांच्या मोतीलाल साहूचा मृतदेह शनिवारी त्याच्या गावी पाठवण्यात आला. मुंबईतून तो गावी जाण्यासाठी निघाला होता. साहूच्या कुटुंबात पत्नी आणि तीन मुली आहेत. मुंबईत तो घरं रंगवण्याचं काम करत होता. लॉकडाऊनमुळे अडकलेला मोतीलाल घराकडे निघाला होता. पैसे संपल्यानंतर मोतीलाल त्याच्यासोबतच्या 50 जणांसह मुंबईतून गावी निघाला होता. यामध्ये मध्य प्रदेशातील 9 जण होते. पहिल्या लॉकडाऊनपर्यंत ते मुंबईतच थांबले होते. मात्र लॉकडाऊन वाढवल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यांच्याकडे कपड्यांशिवाय काहीही उरलं नव्हतं म्हणूनच गावी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. हे वाचा : आजोबांसाठी कबर खोदत होता नातू , शेवटी दोघांनाही एकत्रच दफन करण्याची आली वेळ मुंबईतून निघाल्यानंर मोतीलाल यांचा खदावली इथं मृत्यू झाला. 22 एप्रिलला मध्यरात्री अडीचच्या सुमारास हे लोक नेरुळमधून निघाले होते. यातील काही लोकांकडे मोबाईल होते. त्यावर जीपीएसनुसार निघाले होते. सकाळी  आठ वाजता हे लोक खदावली इथं पोहोचले. तिथं थाबले असताना मोतीलाल साहू यांचा मृत्यू झाला. तेव्हा सोबतच्या सहकाऱ्यांनी 108 ला फोन करून अँब्युलन्सला माहिती दिली. त्यानंतर इतर लोक निघून गेले आणि मृतदेहासोबत शेजाऱच्या गावातील व्यक्ती थांबली. हे वाचा : UAE मधला अब्जाधीश भारतीय झाला कंगाल, एक अहवालाने 50 वर्षांच्या मेहनतीवर पाणी संपादन - सूरज यादव
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या