Home /News /national /

Wonder Kids! पुण्याचा 15 वर्षांचा श्लोक आहे KBC मधील Expert

Wonder Kids! पुण्याचा 15 वर्षांचा श्लोक आहे KBC मधील Expert

सध्या ‘केबीसी’चे 12 वे (KBC 12) पर्व सुरू असून हा आठवडा स्टुडंट स्पेशल आठवडा (Students Special Week) ठेवण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 17 डिसेंबर : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) सूत्रसंचालन करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात ‘केबीसी’ (KBC) या अनोख्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणं ही खूप कठीण गोष्ट आहे. या कार्यक्रमात स्पर्धक बनून अमिताभ बच्चन यांच्या समोर बसणं हेच निव्वळ अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी लोक सातत्यानं अभ्यास करून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशा कार्यक्रमात एक्स्पर्ट (Expert) म्हणून विविध विषयांमधील दिग्गजांची निवड केली जाते. सध्या देशातील दोन वंडर किडस या कार्यक्रमात एक्स्पर्ट म्हणून निवडण्यात आले आहेत. एक आहे हरियाणातील गुगल बॉय कौटिल्य आणि दुसरा आहे महाराष्ट्रातील विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातील अवघ्या 15 वर्षांचा श्लोक सँड (Shlok Sand). सध्या ‘केबीसी’चे 12 वे (KBC 12) पर्व सुरू असून हा आठवडा स्टुडंट स्पेशल आठवडा (Students Special Week) ठेवण्यात आला आहे. या आठवड्यात शालेय विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळाली आहे. त्यांना मदत करण्यासाठी दोन विद्यार्थी एक्स्पर्ट निवडण्यात आले आहेत. श्लोक सँड पुण्यातील बिशप स्कूलमध्ये (Bishop School) इयत्ता 9 वी मध्ये शिकतो. त्याला काहीही प्रश्न विचारा त्याला उत्तर माहित असते, आणि केवळ उत्तर नाही तर त्यासंदर्भातील अन्य माहितीही त्याला आहे. जणू गुगल किंवा एनसायक्लोपीडिया त्याच्या मेंदूत बसवले आहेत. अनेक विषयांमधील त्याचं ज्ञान थक्क करणारं आहे. क्विझ मास्टर, गणितातील तज्ज्ञ आणि स्टोरी टेलिंग मास्टर म्हणून श्लोक ओळखला जातो. त्याशिवाय त्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. खुद्द बिग बी यांनी त्याची ओळख या कार्यक्रमात क्विझ मास्टर आणि गणितातील तज्ज्ञ अशी करून दिली. वयाच्या चौथ्या वर्षापासून त्यानं वेगवेगळ्या विषयांची माहिती घेण्यास सुरुवात केली. श्लोकच्या शाळेनं गेली अनेक वर्षं त्याच्या नेतृत्वाखाली देशातील अनेक मोठ्या क्विझ स्पर्धा जिंकल्या आहेत. स्टोरी टेलिंग ही देखील त्याची खासीयत आहे. तीन वर्षापूर्वी त्यानं एका स्टोरी टेलिंग स्पर्धा जिंकली होती. तेव्हा प्रसिद्ध साहित्यिक आणि कथालेखक रस्किन बाँड (Ruskin Bonds)यांनी खास त्याला भेटायला बोलावलं होतं. याशिवाय त्याला अभिनयाची ही आवड आहे. शाळेतील नाट्य स्पर्धा असो कार्यक्रम असो त्यात तो आवर्जून भाग घेतो. गेली अनेक वर्षं तोच शाळेतील बेस्ट स्टुडंट पुरस्काराचा मानकरी आहे. मेंटल मॅथ्समध्ये (Mental Maths) एक्स्पर्ट आहेच. वयाच्या नवव्या वर्षी अबॅकसचा (Abacus) ग्रँडमास्टर किताब पटकावत त्यानं सर्वांत लहान वयाचा ग्रँडमास्टर बनण्याचा विक्रमही त्यानं स्वतःच्या नावावर नोंदवला आहे. वक्तृत्व स्पर्धेत तो नेहमी भाग घेतो. तो ज्या विषयावर भाषण करतो, त्या विषयाची अथपासून इतिपर्यंतची माहिती त्याला असते. एवढंच नाही तर श्लोक कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्येही तज्ज्ञ आहे. याशिवाय तो मैदानावर खेळण्यातही आघाडीवर असतो. इतकं असूनही श्लोक सोशल मीडियावर फार कमी असतो. सतत नवनवीन शिकण्यात त्याला रस असतो. ‘केबीसी’मध्ये एक्सपर्ट म्हणून निवड झाल्यानंतर त्याचा परिचय करून देण्यात आला तेव्हा त्यानं स्पर्धक विद्यार्थ्यांची पूर्ण मदत करण्याचा प्रयत्न करेन, असं त्यानं अगदी नम्रतेनं सांगितलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: KBC

    पुढील बातम्या