जगण्यासाठी हॉकी खेळाडू झाली बाऊन्सर; आता तिला ओळखतात 'लेडी डॉन' म्हणून...

जगण्यासाठी हॉकी खेळाडू झाली बाऊन्सर; आता तिला ओळखतात 'लेडी डॉन' म्हणून...

Lady Bouncer Job: महिला असणं हा अडथळा न बनू देता हरेक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करणं आता महिलांसाठी नवं नाही. शोभाची कथा खूप प्रेरणादायी आहे.

  • Share this:

भोपाळ, 8 मार्च : बाउन्सर्स हे कुठल्याही सेलेब्रिटीसाठी अत्यावश्यक असतात. बाउन्सर्सचं काम असतं सेलिब्रिटींचं ओसंडणाऱ्या गर्दीपासून संरक्षण. पुरुष बाऊन्सर्सचा सेलेब्रिटींभोवती असलेला वेढा पाहणं आपल्याला नवा नाही. (Bhopal news)

मात्र या क्षेत्रातही आता महिला स्वतःला सिद्ध करत आहेत. भोपाळची महिला बाउन्सर (Lady Bouncer) याच क्षेत्रात आत्मविश्वासानं पाय रोवून उभी राहिली आहे. विशेष म्हणजे वयाच्या केवळ पंचविसाव्या वर्षी तिचा या क्षेत्रातला आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. भास्करनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. (Bhopal Lady Bouncer News)

या बाउन्सरचं नाव आहे शोभा मेहरा. भोपाळमध्ये कमी काळातच तिनं स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. कमी वय असलं तरी आपली कमावलेली शरीरयष्टी, पिळदार बाहू आणि रोखलेले मोठेमोठे डोळे इतक्या भांडवलावर ती मैदानात उभी राहते तेव्हा कुणाचीच वाकडं पाऊल टाकण्याची हिम्मत होत नाही. (Bhopal Shobha Mehra lady bouncer)

भोपाळमध्ये राहून या क्षेत्रात येणं ही शोभानं केलेली लहानशी क्रांतीच आहे. कमालीच्या रूढीवादी वातावरणाची बंधनं तोडत तिनं नवं, पुरोगामी जग उभं केलं आहे. ती सध्या डीबी सिटी मॉलच्या पिचर्स क्लबमध्ये काळ्या गणवेषात तैनात असते तेव्हा अनेकांच्या नजरा कुतूहलानं वळतात. (Bhopal db city mall lady bouncer hockey player story)

हेही वाचा: गात गातच घेतली कोरोना लस; गायिकेच्या लसीकरणाचा VIDEO VIRAL

शोभा मुळची हॉकी खेळाडू आहे. भोपाळमध्ये आपला खेळाचा छंद कायम ठेवत उपजीविका सुरू ठेवण्यासाठी शोभानं हा व्यवसाय निवडला आहे. शोभा आपली आजवरची वाटचाल सांगताना म्हणते, 'मी मूळची इटारसीची आहे. वडील शिव कुमार मेहरा ओर्डिनन्स फॅक्टरीमध्ये काम करतात. आई गुडियाबाई मेहरा गृहिणी आहे. मी हॉकी खेळाडू आहे. खेळात पुढं जाण्यासाठी मी भोपाळला आले. इथं साई अकॅडमीसाठी ट्रायलपण दिलं. अनेकदा जेवणासाठीही पैसे नसायचे. (Shobha Bhopal Bouncer Inspiring Story)

उपजीविका चालवण्यासाठी नोकरी शोधात होते. माझी पर्सनॅलिटी चांगली होती. मग चुलत बहिणीनं मला फिमेल बाउन्सरच्या जॉबबाबत सांगितलं. मी त्यानुसार ढिशुम ग्रुपच्या जॉनी बघेल यांना भेटले. हे भोपाळच्या बाउन्सर ग्रुपचे लीडर आहेत. ते म्हणाले, की मी घाबरले नाही तर नक्कीच काहीतरी चमकदार करून दाखवेन. करून बघ. आवडलं तर सुरू ठेव. त्यानुसार एक वर्ष झालं मी हे काम सुरू केलं. सुरवातीला विचित्र वाटत असे. सोबतीच्या मेल बाउन्सरनं मला बरंच काही शिकवलं. माझ्या क्लबचे अधिकारी दीपेश नेमा यांनी प्रोत्साहन दिलं. अशाप्रकारे मी बाउन्सर बनले.

हेही वाचा सिनेमात शोभेल अशी घटना; 22 वर्षांपूर्वीच्या गँगरेपचा आरोपी अखेर अटकेत

नातेवाईकांनी केली शेरेबाजी

शोभाच्या नातेवाईकांना तिनं निवडलेलं क्षेत्र पसंत पडलं नाही. त्यांनी शेरेबाजी केली. मात्र कुटुंबानं मला कायम सपोर्ट केला. मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत केली. आज सगळे मला आदर देतात. कौतुकानं लेडी डॉन म्हणतात. बाउन्सर काय करतात हे मला पूर्वी माहीत नव्हतं. आता डान्स फ्लोअर किंवा क्लबमध्ये येणाऱ्या महिलांना कुणी त्रास देत असेल तर मी त्यांना आधी वॉर्निंग देते. त्या व्यक्तीनं ऐकलंच नाही इतर त्याला बाहेर काढते. अर्थात काही लोक खूपच आक्रमक होतात. तेव्हा मी माझी पर्सनॅलिटी आणि देहबोली वापरून त्यांना चांगलाच धडा शिकवते.

हेही वाचा ‘रिहानावर टीका का केली?’; सुनिल शेट्टीच्या व्हिडीओवर अभिनेता संतापला

पाहुणे सोबत सेल्फी घेतात तेव्हा आनंद होतो

शोभा सांगते की बाउन्सरचं क्षेत्र खूप आव्हानात्मक आहे. मला छान वाटतं जेव्हा लोक माझं व्यक्तिमत्व पाहून आकर्षित होतात. पार्टीमध्ये येणारी मुलं-मुली माझ्यासोबत सेल्फी घेतात. सगळे म्हणतात, की काय स्ट्रॉंग मुलगी आहे, कुणालाच घाबरत नाही. माझ्या कुटुंबालाही माझा अभिमान वाटतो. माझा खेळपण यात मी मागं पडू दिला नाही. फिट राहण्यासाठी वर्कआऊट करते.

हेही वाचा ममत्व आणि कर्तव्याचा संगम; स्वरानं शेअर केला वर्दीतील झाशीच्या राणीचा व्हिडीओ

कधी बदलणार मानसिकता

माझं निरीक्षण आहे, की आजही लोकांची मानसिकता बदललेली नाही. वर्किंग, कमावत्या महिलांना आजही समाज सन्मानानं पाहत नाही. विशेषतः डीजे, बाउन्सर, बार टेंडर असलेल्या महिलांना चुकीच्या रूपात पाहिलं जातं. काय माहीत, कधी बदलणार माझा देश? पगाराबाबतसुद्धा आपल्याकडे भेदभाव दिसतो. पुरुष बाउन्सरला जास्त पगार मिळतो, जेव्हा स्त्री आणि पुरुष दोन्हीही बाऊन्सर्सची कामं सारखीच आहेत.

Published by: News18 Desk
First published: March 8, 2021, 8:20 AM IST

ताज्या बातम्या