मराठी बातम्या /बातम्या /देश /

Women's day च्या पूर्वसंध्येला नीता अंबानींनी लॉन्च केला नवा उपक्रम; जगभरातील महिलांना जोडण्याचा ध्यास

Women's day च्या पूर्वसंध्येला नीता अंबानींनी लॉन्च केला नवा उपक्रम; जगभरातील महिलांना जोडण्याचा ध्यास

महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया आजच्या काळात डिजिटल झाली पाहिजे. रिलायन्स फाऊंडेशनचा हा नवा प्रयोग तेच करत आहे.

महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया आजच्या काळात डिजिटल झाली पाहिजे. रिलायन्स फाऊंडेशनचा हा नवा प्रयोग तेच करत आहे.

महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया आजच्या काळात डिजिटल झाली पाहिजे. रिलायन्स फाऊंडेशनचा हा नवा प्रयोग तेच करत आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 7 मार्च : यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (8 मार्च, 2021) रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी यांनी एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. खास महिलांसाठीचा हा उपक्रम अतिशय अनोखा आहे. (Reliance foundation)

या उपक्रमाचं नाव आहे 'हर सर्कल'. या लॉन्चिंगवेळी त्यांनी उपस्थित राहत आपलं मनोगत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या, 'हा एक अतिशय वेगळा आणि अद्वितीय मंच आहे. याचा हेतू महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेला चालना देणं असा आहे. सोबतच जागतिक पातळीवर बंधुभाव जोपासण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठीही हा एक प्रयत्न आहे. यातून महिलांना मुख्य प्रवाहात सहभाग, जोडलेपण, आधार आणि उत्स्फूर्त मदत यासाठी एक आनंददायी आणि सुरक्षित ठिकाण मिळेल. (women's day news)

रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी यांनी सांगितलं, की 'मी एक मुलगी म्हणून 11 मुलींच्या कुटुंबात वाढले. मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं गेलं. माझी मुलगी ईशा हिनं मला स्वप्नांचा पाठलाग करत ती पूर्ण करण्यासाठी प्रेम आणि विश्वास दिला. माझी सून श्लोका हिनं मला सहानुभूती आणि हिम्मत शिकवली. मी ज्या रिलायन्स फाउंडेशनच्या किंवा अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील महिलांसोबत काम केलं, त्यांच्या आणि माझ्या अनुभवांमध्ये मला कायमच काही समान धागे दिसले. (reliance foundation chairperson launch her circle)

हेही वाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ वादाच्या भोवऱ्यात; आलिया भट्ट विरोधात आंदोलन सुरु

नीता अंबानी या पुढे म्हणाल्या, की मला आनंद वाटतो, की HerCircle.in हा डिजिटल प्लॅटफॉर्म वापरून आपण लाखो महिलांसाठी संघटन आणि सक्षमीकरणाचं एक असं वर्तुळ बनवू शकतो, जे प्रत्येक महिलेला सहभागी होण्याचं आवाहन करतं. त्या हेसुद्धा म्हणाल्या, की 24*7 जागतिक नेटवर्किंग आणि आणि परस्पर सहकार्याला सक्षम करणाऱ्या डिजिटल क्रांतीसोबतच त्यांचं हे वर्तुळ विविध संस्कृती, समाज आणि देशांतील महिलांचं मनापासून स्वागत करतं. या मंचावर सगळेच समतेसाठी काम करतात. (Nita Ambani launches her circle)

हेही वाचा ममत्व आणि कर्तव्याचा संगम; स्वरानं शेअर केला वर्दीतील झाशीच्या राणीचा व्हिडीओ

प्रत्येक सर्कल कसं काम करतं? (Her Circle digital platform)

नेटवर्किंग आणि लक्ष्यपूर्तीसाठी वनस्टॉप डेस्टिनेशन - प्रत्येक वर्तूळ महिलांशी संबंधित साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी वन स्टॉप डेस्टिनेशनच्या रूपात बनवलं गेलं आहे. या वर्तूळाची रचना अतिशय आकर्षक आणि परिवर्तनशील आहे. कारण हे वर्तुळ सामाजिक मंचाच्या माध्यमातून महिलांना एकमेकींशी जोडतं.

First published:

Tags: Nita ambani, Reliance group, Womens day