मराठी बातम्या /बातम्या /देश /

women's day महिलांचाच नाही पुरुषांचाही असतो खास दिवस! घ्या जाणून कधी आणि का करतात साजरा

women's day महिलांचाच नाही पुरुषांचाही असतो खास दिवस! घ्या जाणून कधी आणि का करतात साजरा

When is Men's Day Celebrated: स्त्री-पुरूष समानता ही काळाची गरज आहे. त्यालाच चालना देतो पुरूष दिन.

When is Men's Day Celebrated: स्त्री-पुरूष समानता ही काळाची गरज आहे. त्यालाच चालना देतो पुरूष दिन.

When is Men's Day Celebrated: स्त्री-पुरूष समानता ही काळाची गरज आहे. त्यालाच चालना देतो पुरूष दिन.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 मार्च : आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. (World Women's Day ) जगभरात 1911 सालापासून हा महिला दिन साजरा केला जातो. आज महिलादिनी आपल्या आयुष्यातील महिलांना शुभेच्छा देतानाच अनेक पुरुषांना एक प्रश्नही पडतोच, 'महिलांचा खास दिवस असतो हे छानच. पण मग आमचा दिवस असतो का? तो असेल तर नक्की कधी असतो?' (international men's day)

तर याचं उत्तर आहे, 'हो, महिला दिनाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन अर्थात मेन्स डेसुद्धा साजरा केला जातो. अगदी 1992 सालापासूनचा इतिहास पुरुष दिनाला आहे. दरवर्षी 19 नोव्हेंबरला हा दिवस साजरा केला जातो. (Men's Day)

पुरुषाच्या जगण्यातील सकारात्मक बाजूंना प्रकाशात आणण्याचा हा दिवस आहे. शेवटी स्त्री आणि पुरूष ही एकाच रथाची दोन चाकं. दोन्हींच्या सामान वेग आणि संतुलनातूनच जीवन सुरळीतपणे पुढं जाऊ शकतं. त्यामुळंच आंतरराष्ट्रीय पुरुष दिनसुद्धा अगदी महिला दिनाइतकाच महत्वाचा आणि औचित्याचा आहे. (When is Men's Day Celebrated)

आजच्या काळात जगताना स्त्री-पुरुष समानता हा सर्वाधिक कळीचा मुद्दा बनलेला आहे. केवळ स्त्रीसाठीच नाही तर पुरुषांसाठीही हे गरजेचं आहे. त्यामुळं दरवर्षी 19 नोव्हेंबरला हे जग अर्ध्या मानवी लोकसंख्येसाठी अर्थात पुरुषांसाठी हा दिवस साजरा करतं. (women's day 2021)

हेही वाचा महिला दिन वर्षातून एकदाच का साजरा करायचा? राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल

जगभरातील 80 देशांमध्ये हा दिवस साजरा होतो. शिवाय UNESCO ही जागतिक संघटनाही हा दिवस साजरा करण्यात सहभागी असते. पुरुष दिवस असा अस्तित्वात आला तो 1992 साली. यावर्षी 7 फेब्रुवारी रोजी थॉमस ऑस्टर यांनी हा दिवस सुरू केला. त्यानंतर 1999 साली पुरुष दिन रीतसर साजरा करण्याची पद्धत सुरू झाली. डॉ. जेरोम तिलुकसिंग यांनी ती सुरू केली. (when and why of men's day)

हेही वाचा अनुष्का-वामिकाचा गोड फोटो शेअर करुन विराटनं लिहिला इमोशनल मेसेज

का साजरा केला जातो पुरुष दिन?

हा दिवस पुरुषांच्या आरोग्याबाबत जागृती करण्यासाठी साजरा केला जातो. सोबतच स्त्री-पुरुषांचे सहसंबंध अधिक निरोगी बनवण्याचे प्रयत्न करण्यासह स्त्री-पुरुष समानतेला चालना देण्याचाही हेतू या दिवसामागे असतो.

हे आहेत पुरुष दिनाचे सहा आधार

पुरुष दिनाचे सहा मुख्य आधार 2009 पासून ठळकपणे समोर आणले गेले. ते खालीलप्रमाणे

1) पुरुषांनी समाजात दिलेलं विधायक योगदान अधोरेखित करणं. सोबतच कुटुंब, विवाहसंस्था, बालसंगोपन आणि पर्यावरणातलाही त्यांचा सहभाग समोर आणणे.

2) पुरुषांचं आरोग्य आणि अधिक चांगल्या जीवनाबाबत चर्चा घडवून आणणे

3) विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांसोबत होणारा सामाजिक भेदभाव समोर आणून त्याला विरोध करणे

4) स्त्री-पुरुष यांच्यातील निरोगी सहसंबंध आणि नातेसंबंधांना बळकटी देणं

5) अधिक सुरक्षित आणि चांगलं जग तयार करणं

6) विधायक काम करणाऱ्या पुरुष रोल मॉडेल्सना प्रमोट करणे. हे रोल मॉडेल्स म्हणजे केवळ अभिनेते, खेळाडू असे सेलिब्रिटी नसतील. तर सामान्यांमधील वेगळा विचार आणि कृती करणारे पुरुष यात असतील.

मागच्या 2020 या वर्षी आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची थीम होती 'मेकिंग अ डिफरंस फॉर मेन अँड बॉईज'

हा दिवस म्हणजे एक निमित्त असतं, पुरुषांचं कर्तृत्व आणि योगदान यांची दखल घेण्याचं. हे योगदान केवळ कौटुंबिक पातळीवर नसून देश, समाज यांच्या पातळीवरचंही असतं. या सोबतच या दिवसाचा व्यापक आणि अंतिम हेतू असतो मानवी मूल्य ठळक करणं.

First published:

Tags: International women's day, Relationship, Womens day