मराठी बातम्या /बातम्या /देश /

‘बलात्कार झाला तर महिला मरण पत्करते, राज्यभर फिरत नाही’, काँग्रेस नेत्याचं बेताल वक्तव्य

‘बलात्कार झाला तर महिला मरण पत्करते, राज्यभर फिरत नाही’, काँग्रेस नेत्याचं बेताल वक्तव्य

New Delhi :  AICC Central Election Authority chairman Mullappally Ramachandran addresses a press conference following the Congress Working Committee meeting, in New Delhi on Monday. PTI Photo by Kamal Singh (PTI11_20_2017_000043 B)

New Delhi : AICC Central Election Authority chairman Mullappally Ramachandran addresses a press conference following the Congress Working Committee meeting, in New Delhi on Monday. PTI Photo by Kamal Singh (PTI11_20_2017_000043 B)

एखादी देहविक्री करणारी महिला जर वारंवार काही सांगत असेल तर ते किती काळ ऐकून घेणार असंही ते बरळले.

  • Published by:  Ajay Kautikwar

तिरुवनंतपूरम 01 नोव्हेंबर: एखाद्या महिलेवर बलात्कार झाला तर ती महिला मरण पत्करते, आपलं आयुष्य संपवते, पुन्हा तसा प्रकार होऊ देत नाही, मात्र ती राज्यभर फिरत नाही असं बेताल वक्तव्य काँग्रेसच्या नेत्याने केलं आहे. केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार मुल्लाप्पल्ली रामचंद्रनं (Kerala Congress chief Mullappally Ramachandran) यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून देशभर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. देशभर महिलांवर अत्याचार (women atrocity) वाढत असताना एका नेत्यानं असं वक्तव्य करावं याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

राज्य सरकारविरुद्ध काँग्रसने राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे. त्या आंदोलनादरम्यान एका सभेत बोलताना त्यांनी हे व्यक्त केलं आहे. केरळमध्ये गेल्या काही वर्षापासून सौर ऊर्जा घोटाळा (solar scandal) गाजत आहे. त्या घोटाळ्यात ज्या महिलेवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्या महिलेने काँग्रेस नेत्याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता.

त्यावरून रामचंद्रन यांनी त्या महिला अधिकाऱ्यावर टीकेची झोड उठवली होती. मुख्यमंत्री हे या महिलेला पुढे करून राजकारण करत आहे. एखादी देहविक्री करणारी महिला जर वारंवार काही सांगत असेल तर ते किती काळ ऐकून घेणार असंही ते बरळले.

केरळचे मुख्यमंत्री या महिलेला पुढे करून राजकारण करत आहे. मात्र त्यांचा हा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही असंही ते म्हणाले. काँग्रेस नेत्याच्या या बेताल वक्तव्यानंतर चौफेर टीका सुरू झाली. त्यानंतर रामचंद्रन यांनी सारवासारव केली.

माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मी राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवल्याने ही टीका करण्यात येत असल्याचंही ते म्हणाले. महिलांच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता. या वक्तव्याबद्दल मी माफी मागतो असं म्हणत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

First published:

Tags: Congress, Kerala