मराठी बातम्या /बातम्या /देश /

har ghar tiranga : तिरंगा ध्वज तयार करणाऱ्या महिला नाराज, काय आहे कारण?

har ghar tiranga : तिरंगा ध्वज तयार करणाऱ्या महिला नाराज, काय आहे कारण?

 यंदा देशाचा 75वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना आणि 'हर घर तिरंगा' अभियान देशभरात सुरू असताना, दुसरीकडे या महिलांमध्ये नाराजी आहे.

यंदा देशाचा 75वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना आणि 'हर घर तिरंगा' अभियान देशभरात सुरू असताना, दुसरीकडे या महिलांमध्ये नाराजी आहे.

यंदा देशाचा 75वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना आणि 'हर घर तिरंगा' अभियान देशभरात सुरू असताना, दुसरीकडे या महिलांमध्ये नाराजी आहे.

 हुबळी, 13 ऑगस्ट : सरकारी वाहनांवर फडकणाऱ्या छोट्या (Tricolour) तिरंग्यापासून, सरकारी इमारतींवर, शाळांवर आणि जगभरातल्या दूतावासांवर, तसेच शूर, हुतात्मा जवानांना ज्यात लपेटलं जातं, अशा सगळ्या राष्ट्रध्वजांची निर्मिती उत्तर कर्नाटकात होते. उत्तर कर्नाटकातल्या हुबळीमधल्या बेंगेरी (Bengeri) गावात कर्नाटक खादी (Khadi) आणि ग्रामोद्योग संयुक्त संघ अर्थात केकेजीएसएसचं (KKGSS) युनिट आहे. तिरंग्याचं उत्पादन आणि जगभरात पुरवठा करण्यासाठी भारतातलं बीआयएस प्रमाणपत्र असलेलं हे एकमेव अधिकृत युनिट आहे. या युनिटमध्ये महिला कामगारांची संख्या लक्षणीय आहे. या युनिटमधल्या महिलांसाठी राष्ट्रध्वजाची निर्मिती करणं हे केवळ काम नसून त्या कामाशी त्यांच्या भावनाही जोडलेल्या आहेत. या महिला प्रत्येक झेंड्याची निर्मिती अतिशय प्रेमानं आणि अभिमानाने करतात. एकीकडे, यंदा देशाचा 75वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना आणि 'हर घर तिरंगा' अभियान देशभरात सुरू असताना, दुसरीकडे या महिलांमध्ये नाराजी आहे. अर्थात त्यामागे कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. बेंगेरी (Karnataka) इथल्या महिला 1957 पासून खादीपासून झेंड्यांची निर्मिती करतात. केंद्र सरकारने यावर्षी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) हे अभियान सुरू केलं आहे. या अभियानासाठी नरेंद्र मोदी सरकारने ध्वजसंहितेत (Flag Code) केलेल्या नव्या सुधारणेमुळे बेंगेरी येथील महिला नाराज आहेत. जुन्या कायद्यानुसार, पॉलिस्टर आणि मशीनच्या साह्याने ध्वजाची निर्मिती करण्यास परवानगी नव्हती. परंतु, डिसेंबर 2021 मध्ये सरकारने यात सुधारणा करून ही बंदी हटवली. या सुधारणेनुसार, खादीव्यतिरिक्त कापूस, रेशीम आणि लाकडी साहित्य देखील झेंडे बनवण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. तसंच त्यांची विणून किंवा हातमागावरही निर्मिती करता येणार आहे. या सुधारणेमुळे साहजिकच वर्षानुवर्षं झेंड्यांची निर्मिती करणाऱ्या बेंगेरी इथल्या महिलांच्या एकूण अर्थकारणावर परिणाम झाला आहे. (आर आर पाटलांचा मुलगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, चर्चांना उधाण) यंदा केकेजीएसएसच्या बेंगेरी युनिटला झेंडे निर्मितीसाठी सुमारे 8 ते 10 कोटी रुपयांची ऑर्डर मिळेल, अशी अपेक्षा होती; पण आत्तापर्यंत या युनिटला केवळ 2 कोटी रुपयांची ऑर्डर मिळालेली आहे. केकेजीएसएसमध्ये सुमारे 1300 व्यक्ती कार्यरत आहेत. त्यापैकी बेंगेरी खादीनिर्मिती युनिटमध्ये 600 कामगार काम करतात. यात 90 टक्के महिला आहेत. यापैकी बहुतांश महिला रोजंदारीवर विणकाम, सूतकताई आणि शिवणकाम करतात. या कामांमधून महिलांना रोज 500 ते 600 रुपये मिळतात. 'विक्रीत घट झाल्याने आमच्या पगारावर परिणाम झाला आहे, तसंच आमचं मनही दुखावलं आहे. देशातल्या प्रत्येक घरावर आम्ही खादीपासून तयार केलेला झेंडा अभिमानाने फडकेल असं आम्हाला वाटलं होतं,' अशी प्रतिक्रिया या युनिटमधल्या एका महिलेनं दिली. 'आम्हाला वाटलं की, यामुळे विक्रीत वाढ होईल आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (India Independence Day) साजरा होईल; पण आता आमची निराशा झाली आहे, कारण केंद्र सरकारने पॉलिस्टरमध्येही मोठ्या प्रमाणात ध्वजनिर्मितीला परवानगी दिली आहे. खादी ही आपल्या देशाची शान आहे. देशासाठी सर्वांत महत्त्वाचा दिवस असताना खादीचा वापर करायला नको का,' असा सवाल या युनिटच्या व्यवस्थापक अनुराधा के. यांनी उपस्थित केला. (हॉलिवूड अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर प्रियांका भावूक; म्हणाली, तुझ्यासाठी माझ्या ...) माजी मु्ख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या 75व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कर्नाटक दौऱ्यावर असताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी खादी युनिटला भेट दिली. त्या वेळी त्यांनी राष्ट्रध्वज हातात घेऊन पोझ दिली होती. 'हर घर तिरंगा' अभियानावर टीका करताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, 'ज्यांनी 52 वर्षांत तिरंगा फडकवला नव्हता, अशा देशविरोधी संघटनांचे प्रतिनिधी आज ही मोहीम राबवत आहेत.' 'स्वातंत्र्यलढ्यादरम्यान कॉंग्रेसला रोखू न शकलेले हे लोक आता कॉंग्रेसला आता रोखू शकणार नाहीत,' असं ट्विटही राहुल गांधी यांनी केलं होतं. ध्वजसंहिता सुधारणेविरोधात केकेजीएसएस आणि कॉंग्रेसने 27 जुलैपासून बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं आहे. याबाबत केकेजीएसएसचे सचिव शिवानंद मठपती यांनी सांगितलं, 'आम्ही आता सर्व खादी उत्पादन युनिटमध्ये आंदोलनाची योजना आखली आहे आणि पॉलिस्टरचा वापर आपल्यासाठी कसा विनाशकारी आहे, यावर प्रकाश टाकला आहे. आमचं म्हणणं मांडण्यासाठी आम्ही पंतप्रधानांकडे वेळ मागणार आहोत.' राष्ट्रध्वज तयार करणं हे सोपं काम नाही. हुबळीमध्ये (Handwoven) बनवलेले सर्व ध्वज हे विणलेले असतात आणि त्यातला प्रत्येक धागा हा हातानं विणलेला असतो. यासाठी साहित्याची गुणवत्ता काटेकोरपणे तपासली जाते. हे साहित्य भारतीय ध्वजसंहितेनुसार असावं, असा नियम आहे. सुरुवातीला खादीचं कापड डेनिमपेक्षा मजबूत आणि कडक मटेरियलमध्ये कातलं जातं. मठपती यांनी सांगितलं की, 'ध्वजनिर्मितीसाठी हाताने कातलेला कापूस दोन प्रकारच्या सामग्रीमध्ये विणला जातो. त्याला केशरी आणि हिरवा रंग दिला जातो आणि दुसरं मटेरियल लांब दंडगोलकार स्लीव्हमध्ये रूपांतरित कसं केलं जातं, ज्यामुळे ध्वज स्तंभावर रोखून धरण्यास मदत होते', हेही त्यांनी सांगितलं. रंगांपासून ते पांढऱ्या घटकांकरिता वापरल्या जाणाऱ्या ब्लीचपर्यंत, सर्व गोष्टी काळजीपूर्वक मोजून मापून घेतल्या जातात. रंग अचूक बनवले गेले जातात. येथे तयार होणारा प्रत्येक ध्वज हा योग्य असतो. तसंच तो प्रेम आणि श्रमातून उत्पादित झालेला असतो, असं मठपती यांनी सांगितलं. तिरंग्यासाठी प्रत्येक रंग वेगळा वापरला जातो आणि त्यासाठीचं साहित्य योग्य आकारात कापलं जातं. अशोक चक्रासाठी निळ्या रंगाचं चिन्ह पांढऱ्या कापडावर छापलं जातं. नंतर केशरी, पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांची कापडं एकत्र शिवून जोडली जातात, जेणेकरून आपल्या भारतीय ध्वजाची निर्मिती होईल. यातल्या धाग्यांच्या संख्येपासून रंगसंगती आणि ध्वजाच्या आकारापर्यंत प्रत्येक गोष्ट ध्वजसंहितेनुसार असणं आवश्यक आहे. भारतीय ध्वजाच्या वैशिष्ट्यांनुसार, तो 3:2 च्या गुणोत्तरासह आयताकृती असावा. त्यामुळे सहा बाय चार इंच आकारापासून 21 बाय 4 फूट आकारापर्यंत वेगवेगळ्या आकारांत ध्वज तयार केले जात असल्याचं मठपती यांनी सांगितलं. चक्र प्रत्येक ध्वजावर स्वतंत्रपणे छापलं जातं. ध्वजाच्या आकारानुसार त्यासाठी किती महिलांला लागतील हे ठरतं. 2 बाय 3 फूट आकाराच्या ध्वजावर दोन महिला चक्राची छपाई करतात. परंतु, मोठ्या म्हणजे 21 बाय 4 फूट आकाराच्या ध्वजावर चक्राची छपाई करताना, ब्लॉक धरण्यासाठी आणि त्याची कापडावर छपाई करण्यासाठी मिळून सुमारे आठ महिलांची गरज भासते. हे काम योग्य पद्धतीनं होणं आवश्यक असतं. तसंच हे काम खूप कष्टाचं आहे. ध्वज पॅक करण्यापूर्वी आणि पाठवण्यासाठी तयार करण्यापूर्वी ध्वजावरच्या सर्व क्रीज लोखंडाच्या साह्याने काढून टाकल्या जातात. भारतीय ध्वज संहिता2002 मधल्या तरतुदींनुसार ध्वजात कोणत्याही स्वरूपाचा दोष असणं हा गंभीर गुन्हा मानला जातो. यासाठी कारावास किंवा दंड अथवा दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते.
First published:

पुढील बातम्या