...मग अशा रिक्षात प्रवास करायचाच कशाला?- किरण खेरांचा बलात्कार पीडितेला अजब सल्ला

...मग अशा रिक्षात  प्रवास करायचाच कशाला?- किरण खेरांचा बलात्कार पीडितेला अजब सल्ला

मुलींनी स्वत:ची काळजी घ्यायला हवी. एखाद्या रिक्षात आधी पासूनच तीन पुरूष बसले असतील तर अशा रिक्षात प्रवास करू नये असं विधान त्यांनी केलं आहे. तसंच त्या तरूण असताना त्या काय काळजी घ्यायच्या हे ही त्यांनी सांगितलं होतं. या विधानावर सगळीकडूनच टीकेची झोड उठते आहे.

  • Share this:

30 नोव्हेंबर: ज्या रिक्शात 3 पुरूष बसलेले दिसत आहेत त्या रिक्षात बसून प्रवास करायचाच कशाला असं वादग्रस्त विधान केलं आहे चंदीगडच्या खासदार  किरण खेर यांनी. काही दिवसांपूर्वी चंदीगडमध्ये झालेल्या एका गॅंगरेपच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.

काही दिवसांपूर्वी चंदीगडमध्ये तरूणी रात्रीच्या सुमारास घरी जाण्यासाठी एका ऑटोमध्ये चढली.त्या ऑटोत आधीपासूनच दोन जण बसलेले होते. नंतर रिक्षा खराब झाल्याचा बहाणा करून रिक्षा चालकाने रिक्षा थांबवली. नंतर त्या तरूणीवर गॅंगरेप करण्यात आला. यासंदर्भात बोलत असताना किरण खेर यांनी असं वक्तव्य केलं आहे. मुलींनी स्वत:ची काळजी घ्यायला हवी. एखाद्या रिक्षात आधी पासूनच तीन पुरूष बसले असतील तर अशा रिक्षात प्रवास करू नये असं विधान त्यांनी केलं आहे. तसंच त्या तरूण असताना त्या काय काळजी घ्यायच्या हे ही त्यांनी सांगितलं होतं. या विधानावर सगळीकडूनच टीकेची झोड उठते आहे.

आपल्या विधानामुळे किरण खेर टि्वटरवर झाल्या ट्रोल! 

किरण खेर यांच्या विधानावर विरोधकांनी टीका तर केलेलीच आहे. पण ट्विटरवर सुद्धा लोकांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. काही जणांनी तर किरण खेर तुम्ही कधी सार्वजनिक वाहनांनी प्रवास केलाय का? असा प्रश्न विचारला आहे. तर काहींनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर काहींनी किरण खेर यांना वास्तवाची जाणीव नाही अशी टीका केली आहे.

काहींनी तर ट्विटरवर त्या बलात्काऱ्यांच समर्थन कसं करू शकतात असा प्रश्नही विचारला आहे. एकंदरच त्यांच्यावर सगळीकडूनच टीकेची झोड उडत असून त्या नव्या वादात अडकल्या आहेत.

माझ्या विधानाला राजकीय रंग द्यायला नको होता-किरण खेर 

किरण खेर यांच्या विधानावर जोरदार टीका करण्यात आली आहे. त्याच्यावर आज किरण खेर यांनी सारवासारव  केली आहे. माझं विधान हे मुलींच्या भल्यासाठी होतं. त्याला राजकीय रंग  देणं गरजेचं नव्हतंं.यावरून आपल्या राजकारणाची अपरिपक्वता दिसते असं त्यांचं म्हणणं आहे.तसंच चंदीगड पोलिसांना मुली कधीही फोन करू शकतात आणि स्वत:ला वाचवण्यासाठी बोलावू शकतात ही माहिती त्यांनी दिली. मुलींनी स्वत:ची काळजी घ्यायला शिकलं पाहिजे एवढंच मला म्हणायचं होतं.माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात  आला असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 04:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading