नवी दिल्ली, 11 जुलै : दिल्लीमध्ये गुन्हेगारांना कोणतीही भीती राहिलेली नाही. कारण भर रस्त्यात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दिल्लीच्या द्वारका परिसरात स्वत:च्या मुलासोबत जाणाऱ्या एका महिलेवर काही तरुणांनी गोळ्या झाडल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला कारने जात होती. अचानक बाईकवर दोन हल्लेखोर आले आणि त्यांनी कारमध्ये असलेल्या महिलेवर गोळीबार केला. महिलेल्या गळ्याला गोळी लागल्यामुळे ती गंभीर जखमी झाली असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. किरण बाला असं हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. ती द्वारकाच्या सेक्टर 12मध्ये राहते.
महिलेवर हल्ला केल्यानंतर काही समजायच्या आत तरुणांनी बाईकवरून पळ काढला. स्थानिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. जखमी महिलेला तात्काळ नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून पोलीस आता घटनेचा तपास करत आहेत.
Delhi: Woman shot at by unidentified assailants near Dwarka Sector 12; more details awaited
— ANI (@ANI) July 11, 2019
हल्लेखोरांनी अचानक येऊन महिलेवर गोळ्या झाडल्यामुळे त्यांनी एक गोळी गळ्यामध्ये लागली. त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
भररस्त्यात गोळ्या झाडून आरोपी फरार...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला तिच्या मुलासोबत कारमधून चालली होती. त्याचवेळी अज्ञान हल्लेखोर आले आणि त्यांनी महिलेवर अंदाधुंद गोळीबार केला. यातील एक गोळी महिलेच्या गळ्याला लागली. त्यामुळे महिला गंभीर जखमी आहे. दिवसा अशा पद्धतीने जर हल्ले होणार असतील तर दिल्लीमधील सामान्य जनता रामभरोसे आहे असंच म्हणावं लागेल.